मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने पोट बिघडलं; बद्धकोष्ठतेवर 'हे' सोपे घरगुती उपाय करा

पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने पोट बिघडलं; बद्धकोष्ठतेवर 'हे' सोपे घरगुती उपाय करा

बेकरी प्रॉडक्ट्स सगळ्यांनाच पचतात असं नाही. अनेकदा तर जेवणाऐवजीच हे पदार्थ खाल्ले जातात. चविष्ट असल्याने प्रत्येकाला हे पदार्थ आवडतात; पण ते आरोग्यासाठी घातक (Dangerous to health) असतात.

बेकरी प्रॉडक्ट्स सगळ्यांनाच पचतात असं नाही. अनेकदा तर जेवणाऐवजीच हे पदार्थ खाल्ले जातात. चविष्ट असल्याने प्रत्येकाला हे पदार्थ आवडतात; पण ते आरोग्यासाठी घातक (Dangerous to health) असतात.

बेकरी प्रॉडक्ट्स सगळ्यांनाच पचतात असं नाही. अनेकदा तर जेवणाऐवजीच हे पदार्थ खाल्ले जातात. चविष्ट असल्याने प्रत्येकाला हे पदार्थ आवडतात; पण ते आरोग्यासाठी घातक (Dangerous to health) असतात.

    दिल्ली, 25 डिसेंबर: फास्टफूड आणि त्यातही पिझ्झा, बर्गर खाण्याची सवय वाढत चालली आहे.  बेकरी प्रॉडक्ट्स सगळ्यांनाच पचतात असं नाही. अनेकदा तर जेवणाऐवजीच हे पदार्थ खाल्ले जातात. चविष्ट असल्याने प्रत्येकाला हे पदार्थ आवडतात; पण ते आरोग्यासाठी घातक (Dangerous to health) असतात. हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी बरेच जण डॉक्टरांकडे जातात. घरगुती उपचारांनीदेखील ही समस्या दूर करणं शक्य आहे. पोटाशी संबंधित समस्यावर चांगल्या घरगुती (Home Remedies) उपायांची माहिती येथे देत आहोत. त्याद्वारे त्वरित आराम मिळू शकतो.

    बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असलेल्या फळांचं सेवन करावं. तंतुमय पदार्थ जास्त असलेल्या अन्य पदार्थांचाही समावेश आहारात करावा. पपई हे फळ या संदर्भात चांगलं काम करतं. जेवणामध्ये सॅलडचा (Health Benefits Of Salad) समावेश करावा. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोज मर्यादित प्रमाणात सॅलडचं सेवन केल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही, अशी माहिती 'टीव्ही 9 हिंदी'ने दिलेल्या वृत्तात आहे.

    तुम्हीही ब्रेडचा करपलेला भाग खाता का? मग महाभयंकर आजाराला निमंत्रण देताय

    सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून घेतलं, तर पोट साफ न होण्याची समस्यादेखील दूर होईल. गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास आरोग्याला इतरही काही फायदे होतात.

    जेवणानंतर अनेकांना बडीशेप (Fennel Seeds) खाण्याची सवय असते. बडीशेप खूपच गुणकारी असते. बडीशेप खाण्याचे आणखीही अनेक फायदे असतात. पचनाशी संबंधित समस्या असल्या, तर दररोज जेवण झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खावी.

    Explainer : औषधाच्या गोळ्यांवर का असते ही रेष माहिती आहे का?

    बडीशेप खाल्ल्यास पोटात गॅस निर्माण होत नाही. तसंच सकाळी पोट साफ होतं.

    याशिवाय, पोट साफ करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे लस्सी. पोटाशी संबंधित समस्या असतील, तर दररोज दुपारी एक ग्लास लस्सी प्यावी. त्यात थोडंसं जिरं आणि काळं मीठ घालावे. हे केल्याने पोटातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पोट नेहमी स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. पोट साफ होत नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Bread butter, Food, Health, Home remedies, Pizza, Processed food