जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अवघ्या 10 रुपयांपासून घरात लागणाऱ्या वस्तू, पुण्यात कुठं भरला आहे बाजार ? video

अवघ्या 10 रुपयांपासून घरात लागणाऱ्या वस्तू, पुण्यात कुठं भरला आहे बाजार ? video

अवघ्या 10 रुपयांपासून घरात लागणाऱ्या वस्तू, पुण्यात कुठं भरला आहे बाजार ? video

या बाजारात साध्या वस्तूंपासून ते ब्रँडच्या वस्तूंपर्यंत सगळ्या वस्तू स्वस्तात खरेदी करता येतात.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 29 जुलै : शॉपिंग हा तसा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. पुण्यात अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही कमी किमतीत चांगल्या वस्तू खरेदी करू शकतात. त्या पण चांगल्या क्वालिटीच्या वस्तू असतात. यामध्ये अनेक ब्रँडच्या वस्तू देखील असतात. पुण्यातील हिंजवडी परिसरात अश्याच वस्तूंचा बाजार भरला आहे. यामध्ये साध्या वस्तूंपासून ते ब्रँडच्या वस्तूंपर्यंत सगळ्या वस्तू स्वस्तात खरेदी करता येतात. कोणत्या मिळतात वस्तू? मुंबई बाजार गेल्या 8 महिन्यापासून पुण्यातील हिंजवडी परिसरात आहे. या ठिकाणी तुम्ही घरात लागणाऱ्या वस्तू डब्बा, प्लेट, वाटी, बॉटल, झाडू, सुपली, मॉप, प्लास्टिकसह स्टीलच्या वस्तू खरेदी करू शकतात. तसेच रोज वापरातील कपडे अशा विविध वस्तू स्वस्तात खरेदी करू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे किंमत? ह्या बाजारामध्ये तुम्हाला 10 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत घरातलं आणि किचन वेअर सामान मिळेल. तसेच 5 हजार पेक्षा जास्त व्हराइटी पण या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे मिलटोनमध्ये डबे, बॉटल अशा खूप साऱ्या व्हराइटीमध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील, असं या मार्केटचे मालक लक्ष्मण प्रजापती यांनी सांगितलं. कमी किमतीत वस्तू बाहेर दुकानात मिळणाऱ्या वस्तूंच्या किंमती पेक्षा 10 ते 20 टक्के कमी किमतीत आणि एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू तुम्हाला खरेदी करायला भेटतात.  हा मुंबई बाजार गेल्या 8 महिन्या पासून हिंजवडी परिसरात आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता, असंही लक्ष्मण प्रजापती यांनी सांगितलं.

फक्त 100 रुपयांत सुंदर दिसेल घराची खिडकी, यापेक्षा स्वस्त पडदे कुठेच नाही! Video

कुठे कराल खरेदी? हे मार्केट हिंजवडी मारुंजी रोडवर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात