आज ( 20 मार्च ) होळी. सगळीकडे रात्री होळी पेटवून तिची पूजा केली जाते. होळीत गहू, नारळ अर्पण केला जातो. होलिका दहन झाल्यानंतर अनेक जण ती राख आपल्या घरी घेऊन येतात. त्याचा खूप उपयोग होतो.
होळीच्या राखेत थोडी राई आणि मीठ टाका. एका भांड्यात ती राख ठेवून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. वाईट नजरेपासून घराचा बचाव होतो. पैशाची चणचणही दूर होते.
होळीची राख शंकराच्या पिंडीवर लावली तर जन्मपत्रिकेतले दोष दूर होतात. राख पाण्यात मिसळून पिंडीवर अभिषेक करू शकता.