मुंबई, 27 जून : वाल्मिकी ऋषींनी रचलेलं रामायण हे एक महाकाव्य आहे. या महाकाव्याला आपल्या हिंदू धर्मात पवित्र ग्रंथ मानलं गेलं आहे. बहुसंख्य भारतीयांना रामायणातील कथा माहिती आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे रामायण आणि त्यातील कथा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सोशल मीडियावर रामायणाशी संबंधित विविध प्रश्नमंजुषाही व्हायरल होत आहेत. ‘डीएनए’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1) सीतामातेचा शोध घेण्यासाठी लंकेत गेलेल्या हनुमानाला, अशोक वाटिकेमध्ये सीता माता कोणत्या वृक्षाखाली बसलेल्या दिसल्या होत्या? 2) श्रीरामाचा धाकटा भाऊ आणि आयोध्येचा राजपुत्र असलेला लक्ष्मण कोणाचा अवतार होता? 3) श्रीरामांचं लक्ष विचलित करण्यासाठी कोणता राक्षस सोनेरी हरिणाचं रूप धारण करून आला होता? 4) श्रीरामाला वनवासात पाठवणारी कैकयी कोण होती? 5) सीता स्वयंवरामध्ये श्रीरामांनी तोडलेल्या धनुष्याचं नाव काय होतं? 6) सीतामातेच्या शोधासाठी लंकेत जाताना हनुमानानं कोणत्या राक्षसीचा वध केला होता? 7) हनुमानानं कोणत्या पर्वतावरून संजीवनी औषधी आणली होती? 8) रामायणात उर्मिला कोण होती? 9) श्रीरामानं कोणत्या अस्त्रानं रावणाचा वध केला? 10) वनवासात असताना श्रीरामांनी कोणाची उष्टी बोरं खाल्ली होती? वरील सर्व प्रश्नांची उत्तरं अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत… 1) सिनस्पा वृक्ष, 2) शेषनाग, 3) मारिच, 3) राजा दशरथाची दुसरी पत्नी, 4) पिनाक, 5) लंकिणी, 6) संजीवनी पर्वत, 7) लक्ष्मणाची पत्नी, 8) लक्ष्मणाची पत्नी, 9) दिव्यास्त्र, 10) शबरी. रामायण हे प्रत्येक हिंदूधर्मियांसाठी अतिशय पवित्र आहे. त्यातील मूल्यं आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात, असं मानलं जातं. मात्र, आदिपुरुष चित्रपटामध्ये रामायणातील अनेक मूळ गोष्टींमध्ये फेरबदल करून नवीन पिढीला चुकीची माहिती दिली जात असल्याचं, प्रेक्षकांचं म्हणणं आहे. नवीन पिढीला रामायणातील खरी गोष्ट माहिती व्हावी, यासाठी काहीजणांनी प्रयत्न करून प्रश्नमंजुषेसारखे उपक्रम सुरू केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.