जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी हिपॅटायटीस-ई संसर्गाचा धोका, जाणून घ्या नेमकं काय आहे

गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी हिपॅटायटीस-ई संसर्गाचा धोका, जाणून घ्या नेमकं काय आहे

गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी हिपॅटायटीस-ई संसर्गाचा धोका, जाणून घ्या नेमकं काय आहे

हेपॅटायटीस-ई संसर्ग मानवी मूत्राद्वारे पसरतो. जर स्वच्छतेची काळजी घेतली नाही, तर हेपेटायटीस-ई संसर्गाचा धोका वाढतो. स्वच्छ पाणी पिण्याबरोबरच आहार घेताना सुध्दा स्वच्छता बाळगली पाहिजे. हात स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक आहे.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    हेपेटायटीस-ई (Hepatitis E) संसर्ग प्रथम काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात 1978 मध्ये पसरला. या संसर्गामुळे यकृत संसर्ग झाल्याची नोंद झाली. याचा सर्वात जास्त परिणाम गर्भवती महिला आणि नवजात शिशुंवर होतो. आज जगभरात दोन कोटीहून अधिक लोक दरवर्षी हेपॅटायटीस-ईच्या संसर्गाला बळी पडतात. याने ग्रासलेल्या गर्भवती महिलांपेक्षा लहान मुलांमध्ये विषाणूचा फैलाव जास्त असल्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या घटना अधिक समोर येतात. myupchar.com च्या डॉ. आयुष पांडे यांच्या मते, या विषाणूमुळे यकृत सूजते. दूषित अन्न आणि पाणी ही या आजाराची कारणे आहे. अशाप्रकारे हेपॅटायटीस**-ई संसर्गाचा प्रसार होतो हेपॅटायटीस-ई संसर्ग मानवी मूत्राद्वारे पसरतो. जर स्वच्छतेची काळजी घेतली नाही, तर हेपेटायटीस-ई संसर्गाचा धोका वाढतो. स्वच्छ पाणी पिण्याबरोबरच आहार घेताना सुध्दा स्वच्छता बाळगली पाहिजे. हात स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक आहे. याची लक्षणे जाणवण्यास एक आठवडा ते एक महिना लागू शकतो. यामध्ये ताप, थकवा, उलट्या होणे, चक्कर येणे, पोटदुखी, भूक न लागणे आणि डोळ्यांचा पिवळसरपणा या लक्षणांचा समावेश आहे. आपल्याला अशी काही लक्षणे दिसल्यास आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि स्वतःची तपासणी करुन घ्यावी. हेपिटाइटिस- हा एक आरएनए व्हायरस आहे हेपॅटायटीस-ई विषाणू हा आरएनए व्हायरस आहे. या विषाणूचे चार जीनोटाइप आहेत. यापैकी आशिया खंडात केवळ जीनोटाइप -1 विषाणूच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. गर्भावस्थेत हा विषाणू अधिक प्रभावित करतो. **हेपॅटायटीस**-**ई मुळे रोगप्रतिकार प्रणाली देखील बिघडते या संसर्गाचा तिसर्‍या महिन्यात गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. या संसर्गामुळे, बर्‍याच वेळा गर्भवती महिलेच्या गर्भातच मुलाचा मृत्यू होतो. गर्भवती महिलांमध्ये या विषाणूचा तिच्यापासून गर्भातील बाळाला संसर्ग होण्याचा धोका 50 टक्क्यांपर्यंत आहे. गर्भधारणेदरम्यान हेपॅटायटीस-ई संसर्गामुळे मुलाच्या आणि आईच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. याशिवाय, गर्भवती महिलेची संप्रेरक प्रणाली देखील बिघडू शकते. यकृत निकामी झाल्यास प्रत्यारोपण हॅपीटाइटिस-ई विषाणूने संक्रमित झालेल्यांपैकी 15 ते 20 टक्के लोक मरण पावतात. या विषाणूने संक्रमित 15 ते 60 टक्के रुग्णांमध्ये यकृत निकामी होण्याची शक्यता अधिक असते.यासाठी यकृत निकामी झाल्यास यकृत ताबडतोब प्रत्यारोपण केले जाऊ शकते. यासाठी, रुग्णाच्या घराच्या सदस्याच्या परवानगीने देणगीदाराचे यकृत स्वेच्छेने रुग्णामध्ये प्रत्यारोपण केले जाऊ शकते. परंतु ज्या रुग्णालयात रूग्ण उपचार घेत आहे अशा रुग्णालयात या प्रत्यारोपणाची सुविधा असणे फार महत्वाचे आहे, कारण यकृत प्रत्यारोपणासाठी बराच काळ थांबता येत नाही. यामुळे रूग्ण मरण पावतो. अशी सावधगिरी बाळगा गर्भावस्थेत, स्त्रियांनी जास्त अन्न खावे जेणेकरून त्यांची रोगप्रतिकार क्षमता बळकट होईल. या व्यतिरिक्त, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. गर्भाच्या विकासाच्या प्रक्रियेत उघड्यावर शौच करणे टाळावे आणि जास्तीत जास्त हिमोग्लोबिन वाढवणारा आहार, फळे आणि पौष्टिक अन्न खावे. myupchar.com च्या डॉ. आयुष पांडे यांच्या म्हणण्यानुसार, या आजाराशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे तपासून याची चाचणी करुन घ्यावी. रक्त तपासणीद्वारे हेपेटायटीस-ई ची चाचणी केली जाते.

    अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी: लक्षणे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: health
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात