जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हार्ट अटॅकनंतर लैंगिक संबंध ठेवणं हृदयासाठी पुन्हा धोक्याचं ठरू शकतं?

हार्ट अटॅकनंतर लैंगिक संबंध ठेवणं हृदयासाठी पुन्हा धोक्याचं ठरू शकतं?

हार्ट अटॅकनंतर लैंगिक संबंध ठेवणं हृदयासाठी पुन्हा धोक्याचं ठरू शकतं?

हार्ट अटॅक (heart attack) येऊन गेलेल्या रुग्णांना लैंगिक संबंध ठेवताना पु्न्हा हृदय विकाराचा झटका येण्याची भीती वाटते.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    लैंगिक संबंध हा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. मात्र शरीर संबंधाच्या वेळी हृदयाला अतिरिक्त काम करावं लागतं. जसजशी उत्तेजना वाढते तसतसे हृदयाचे ठोके अधिक वेगाने वाढू लागतात, आणि हृदयाला अधिक रक्त पंप करावे लागते, त्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळेच लोकांच्या मनात पुन्हा हृदय विकाराचा झटका येण्याची भीती घर करते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर शरीर संबंध ठेवावेत की ठेऊ नये? असा प्रश्न अनेकांना सतावतो. प्रश्न महत्वाचा आहे पण लोक डॉक्टरांना याबाबत विचारायला संकोच करतात. अमेरिकेमध्ये अनेक हृदयरोग तज्ज्ञांनी चर्चा करून एका अहवालामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हृदय विकाराचा झटका आल्यानंतरसुद्धा लैंगिक संबंध ठेवता येऊ शकतात. लैंगिक संबंध हृदयासाठी तितकं जोखमीचं नाही, जितकी त्याची भीती बाळगली जाते. म्हणून हृदयरोगी कुठलीही चिंता न करता आपल्या लैंगिक आयुष्याचा आनंद घेऊ शकतात. का वाटते अंथरुणात मृत्यू येण्याची भीती**?** द अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, हृदयविकाराचा झटका सहन केलेल्या पुरुष आणि महिलांनी सांगितलं की लैंगिक संबंध ठेवताना अंथरुणात जीव जाण्याची भीती त्यांच्या मनात आहे. जेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, घाम यायला लागतो तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं दिसायला लागतात. विशेषत: ही भीती महिलांना जास्त सतावते. पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर अनेक महिला औदासिन्य अनुभवायला लागतात, त्याचा परिणाम त्यांच्या लैंगिक आयुष्यावर होतो. हृदयविकाराच्या झटक्यानंतर 60 टक्के महिलांचं लैंगिक आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. अमेरिकेच्या कार्डिओवस्क्युलर हेल्थ क्लिनिकचे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात की या विषयावर लोकांनी बोलायला पाहिजे. जर हृदयरोगी पुन्हा नव्याने सामान्य आयुष्य सुरू करेल आणि पूर्वीसारखंच लैंगिक आयुष्य जगेल तर ते त्याच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. हृदयासाठी चांगले असतात शरीर संबंध myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. नबी वली म्हणाले, हृदयविकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा हृदयाकडे जाणारा ऑक्सिजनयुक्त रक्त प्रवाह अवरुद्ध होतो. हे अनेक कारणांनी होऊ शकते, त्यात चरबी आणि कोलेस्ट्रॉल वाढणं याचाही समावेश आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीच्या अहवालानुसार लैंगिक संबंधांना हृदयासाठी चांगलं मानलं गेलं आहे. एकदा हृदयविकाराचा झटका आलेल्या 10,000 रुग्णांचा अभ्यास केला गेला. ते सगळे आठवड्यातून एकदा शरीर संबंध ठेवत होते. त्यात असं दिसून आलं की फक्त दोन - तीन जणांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता. शरीर संबंधाच्या वेळा होणारा हृदयाचा व्यायाम त्याला स्वस्थ बनवतो. अहवालानुसार शरीरसंबंधाच्या वेळी मृत्यू येण्याची शक्यता फारच कमी आहे. हा आकडा 0.6 टक्के ते 1.7 टक्के आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर स्वतःला शरीर संबंधांसाठी कसं तयार कराल? हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर पूर्ण आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण लैंगिक आयुष्य सुरू करण्यासाठी काही गोष्टी करायला हव्या. याला हार्ट रिहॅब अथवा कार्डियाक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम म्हटलं जातं. myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, त्यासाठी क्रियाशील जीवनाची सुरवात करा, आरोग्यवर्धक पदार्थ खा, हृदयाला नुकसानदायक रक्तदाब , कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि धूम्रपान यावर नियंत्रण ठेवा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख -  कार्डिअ‍ॅक अरेस्ट न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात