जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Heart Health : हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायाम ठेवा संतुलित, तज्ज्ञांनी सांगितले 'या' गोष्टींकडे द्या लक्ष!

Heart Health : हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायाम ठेवा संतुलित, तज्ज्ञांनी सांगितले 'या' गोष्टींकडे द्या लक्ष!

व्यायामाचा फायदा मिळवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुरक्षित व्यायाम करणं गरजेचं आहे.

व्यायामाचा फायदा मिळवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुरक्षित व्यायाम करणं गरजेचं आहे.

एकूण आरोग्यासाठी मध्यम स्वरुपाचा व्यायाम फायदेशीर मानला जातो. पण जास्त व्यायाम केल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयाचं कार्य चांगलं राहण्यासाठी संतुलित व्यायाम गरजेचा आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 जुलै : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. हृदय, रक्तवाहिन्या तसंच मानसिक आरोग्यासाठी डॉक्टर नियमित व्यायामाचा सल्ला देतात. बहुतांश लोक फिटनेससाठी रोज व्यायाम करतात. एकूण आरोग्यासाठी मध्यम स्वरुपाचा व्यायाम फायदेशीर मानला जातो. पण जास्त व्यायाम केल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयाचं कार्य चांगलं राहण्यासाठी संतुलित व्यायाम गरजेचा आहे. तीव्र स्वरुपाचा व्यायाम केल्यास कोणत्या समस्या उद्भवू शकतात, या विषयी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संतोषकुमार डोरा यांनी मार्गदर्शन केलं आहे. नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाली हा निरोगी जीवनशैलीचा आधारस्तंभ मानला जातो. यामुळे हृदय, रक्तवाहिन्यांसह मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आयुष्य वाढतं. रोज मध्यम स्वरुपाचा व्यायाम करणं फायदेशीर असलं तरी हृदयाच्या आरोग्याचा विचार करून नेमका कोणत्या स्वरुपाचा व्यायाम करावा हे माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती न देता शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला तर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंदर्भात आजार होण्याचा धोका वाढतो. यात मायोकार्डियल डॅमेज आणि कार्डियाक अरिथमिया (मध्यम स्वरुपाचा व्यायाम केला तरी हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित समस्या कमी होतात. मात्र दीर्घकाळ जास्त तीव्र वर्कआऊट केलं तर त्याचा विपरित परिणाम शरीरावर होतो.) संसर्ग यांचा समावेश होतो. तीव्र स्वरुपाचा व्यायाम केल्यास ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोमची जोखीम वाढते. जेव्हा एखादी व्यक्ती व्यायामाच्या तणावातून बाहेर येण्यासाठी तिच्या शरीराची क्षमता ओलंडते, तेव्हा तिला तीव्र थकवा जाणवतो आणि तिच्या कार्यक्षमतेत बिघाड होतो, त्याला ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम म्हणतात. तीव्र व्यायामामुळे हृदयाच्या इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. परिणामी, हृदयाचे ठोके असामान्य होऊ शकतात. जरी हा प्रकार सौम्य आणि स्वयं मर्यादित असला तरी त्यामुळे आर्टिअल फायब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर थायकार्डियासारख्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकतात. जर हृदयविकार किंवा अरिथमियाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तर अशा व्यक्तींना स्वतःसाठी सुरक्षित व्यायामाचे मापदंड निश्चित करण्यासाठी आणि संभाव्य जोखीम कमी करण्यासाठी हेल्थकेअर प्रोव्हायडरशी सल्लामसलत करावी. व्यायामाचा फायदा मिळवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुरक्षित व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 1 : व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवा : व्यायामाची तीव्रता अचानक वाढवू नये. त्याऐवजी हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवा. यामुळे शरीर व्यायामाशी जुळवून घेईल आणि अतिश्रमामुळे निर्माण होणारे धोके टळू शकतील. 2 : तुमच्या शरीराचं ऐका : सतत थकवा येणं, कार्यक्षमता कमी होणं किंवा विश्रांती घेताना हृदयाची गती वाढणं यासारख्या तीव्र व्यायामामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्या. तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर विश्रांती घ्या आणि बरं होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. 3 : व्यायाम आणि विश्रांतीचे दिवस यांचे नियोजन करा : जास्त प्रमाणात व्यायाम करत असाल तर शरीराला आराम मिळावा यासाठी पुरेसा वेळ द्या. स्नायु, हॉर्मोनचं संतुलन आणि एकूणच हृदय, रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. 4 : संतुलित व्यायामाची दिनचर्या ठेवा : तुमच्या दिनचर्येत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाचा समावेश करा. हृदय आणि सांध्यावरील ताण कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्नायुंत लवचिकता आणणारे व्यायाम आणि हलक्या व्यायामासह हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी अॅक्टिव्हिटी एकत्रितपणे करा. 5 : हायड्रेटेड रहा : हृदय आणि रक्तवाहिन्यांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी योग्य हायड्रेशन गरजेचं आहे. पुरेसं द्रव संतुलन राहावं यासाठी व्यायाम सुरू करण्यापूर्वी, व्यायामादरम्यान आणि व्यायामानंतर पुरेसं पाणी प्या. 6 : सूचक इशाऱ्यांकडे लक्ष द्या : जर तुम्हाला छातीत दुखणं, धडधडणं, श्वासोच्छवासाचा तीव्र त्रास किंवा व्यायामादरम्यान अथवा नंतर चक्कर आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्यासाठी तीव्र स्वरुपाचा व्यायाम फायदेशीर असल्याचं सांगितलं जात असलं तरीही यामुळे हृदयाला होणाऱ्या संभाव्य धोक्यांची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा त्यात बदल करण्याअगोदर तज्ज्ञ हेल्थकेअर प्रोव्हायडरचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात