सामान्यतः असं मानलं जाते की हिरव्या भाज्या, फळे इत्यादी पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने वजन (weight) वाढत नाही. योग्य माहितीच्या अभावी लोक अशा अनेक पौष्टिक अन्नपदार्थांचा (healthy food) आपल्या आहारात समावेश करतात, ज्यात केवळ उच्च उष्मांकच नव्हे तर शरीराची चरबीदेखील (body fat) वाढते. जाणून घ्या अशा आरोग्यास उपयुक्त आहारांबद्दल जे आरोग्यासाठी चांगले तर मानले जातात पण वजन वाढवण्यात (weight gain) देखील ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आंब्यात बराच उष्मांक असतो फळांचा राजा आंबा सर्वांनाच आवडतो. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, आंबा जीवनसत्त्वे अ, सी आणि डी सारख्या पोषक द्रव्यांनी समृद्ध आहे. चव चांगली असल्याने बरेच लोक हा जास्त प्रमाणात खातात आणि वजन वाढवून घेतात. वास्तविक आंब्यात बरेच उष्मांक असतात. हे शरीरासाठी हानिकारक नाही, मात्र वजन वाढवण्यासाठी निश्चितच जबाबदार आहे. याशिवाय जास्त आंबा खाल्ल्यास मुरुम, अतिसार, रक्तातील साखर वाढणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अननसामध्ये असते खूप साखर अननस हे देखील आरोग्यदायी फळ आहे, पण त्याचं सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो. कारण अननस खाल्ल्याने शरीरात साखरेची पातळी वाढते. याशिवाय अननसामध्ये ब्रोमलाइनदेखील आढळतं जे शरीरात जाऊन प्रथिनामध्ये रुपांतरित होतं. बर्याच वेळा या कारणास्तव काही लोकांना खाज सुटण्याची समस्या होते. जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर अननसाचं सेवन जास्त प्रमाणात करणं टाळावं. मधदेखील वजन वाढवतं आयुर्वेदात मध अमृतासमान मानलं जाते आणि बर्याच संशोधनात असंही निदर्शनास आलं आहे की, मधात पुष्कळ पोषक तत्वं असतात. तरी देखील जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मधाचं सेवन संतुलित प्रमाणात केलं पाहिजे, कारण मध अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल आहे, म्हणूनच ते गोड मानलं जातं. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते ते साखरेसारखे हानिकारक नसलं तरी वजन नक्कीच वाढवू शकते. घरगुती दही लठ्ठपणा वाढवतं दही शरीरासाठी खूप फायदेशीर असून ते पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. दुधापेक्षा दह्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात, पण घरी तयार केलेल्या दह्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. म्हणून जास्त सेवन केल्यास शरीराचं वजन वाढू शकते. त्याचवेळी दुग्धजन्य पदार्थ म्हणून बाजारात मिळणाऱ्या दह्यामधली चरबी आधीच काढून टाकलेली असते. डेअरीमध्ये मिळणारे दही कमी गुणवत्तेचे असते पण जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर कमी चरबीचं दहीच खायला हवं. अक्रोड गुणकारी पण चरबीचा खजिना मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड खाणं चांगलं मानलं जातं. अक्रोडमध्ये जीवनसत्व ई, लोह, पोटॅशियम, झिंक, अँटी-ऑक्सिडंट आणि ओमेगा -3 फॅटी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषण मिळतं. पण जर ते संतुलित प्रमाणात सेवन केलं नाही तर शरीराची चरबी वाढू शकते. एकंदरीत पौष्टिक पदार्थ खा, पण हे लक्षात घ्या की त्याचे जास्त सेवन शरीरासाठी हानिकारक तर ठरत नाही. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - सुरक्षितरित्या वजन वाढवण्याचे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.