मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्ही आजारी पडण्यामागे प्रिझर्वेटिव्ह फूड्स तर कारण नाही ना? वाचा त्याचे दुष्परिणाम 

तुम्ही आजारी पडण्यामागे प्रिझर्वेटिव्ह फूड्स तर कारण नाही ना? वाचा त्याचे दुष्परिणाम 

Healthy Eating Tips : प्रिझर्वेटिव्हमुळे शरीरातील सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाणही वाढते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो. ही परंपरा खरंतर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्यासाठी पूर्वीच्या काळी मीठ, तेल इत्यादींचा वापर केला जात असे, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या खराब होण्यापासून वाचत होते. पण आजकाल अन्न पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी कृत्रिम गोष्टींचा वापर केला जात आहे. Healthytrix वेबसाइटनुसार, या कृत्रिम संरक्षक गोष्टी खरोखरच अन्नातील ब्युटाइलेटेड हायड्रॉक्सीटोल्यूएन आणि अन्नाची रासायनिक रचना बदलतात, ज्यामुळे आरोग्याचे मोठे नुकसान (Easy Way To Cut Out Preservatives From Your Diet) होऊ शकते. असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास दमा, अतिसंवेदनशीलता, ऍलर्जी, अतिक्रियाशीलता, मानसिक त्रास आणि वजनही वाढू शकतं.

हे नुकसान होऊ शकते

प्रिझर्वेटिव्हमुळे शरीरातील सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाणही वाढते.

अशा प्रिजर्वेटिव गोष्टींपासून दूर राहा

1. लेबलिंग पाहून खरेदी करा

जेव्हा तुम्ही कोणताही खाद्यपदार्थ खरेदी करता तेव्हा त्याचे लेबलिंग वाचा. प्रिझर्वेटिव्ह आणि त्यांचा उद्देश ओळखण्यात मदत करण्यासाठी प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पॅकेजिंगवर घटकांची यादी असते.

हे वाचा - हे पदार्थ निष्काळजीपणे खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

2. आरोग्यदायी पर्याय निवडा

जेव्हा तुम्ही बाजारातून एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा ताजी फळे, संपूर्ण धान्य, भाज्या, कच्चे सुके फळ, बियाणे, चव नसलेले दुग्धजन्य पदार्थ इत्यादी खरेदी करा. डबाबंद पॅकेजड् केलेले अन्न, फ्रोज़न फूड, मसाले, सॉस, गोड पेये, चिप्स आणि ब्रेड इत्यादी खरेदी करणं टाळा.

हे वाचा - Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा

3. घरी बनवलेले अन्न खा

प्रिझर्व्हेटिव्ह्ज टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बाहेरून विकत घेण्याऐवजी घरी शिजवलेले अन्न खाणे. घरीच मसाले बनवा आणि ताजे अन्न खाण्यास प्राधान्य द्या.

First published:

Tags: Health Tips, Processed food