जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रत्येकी 40 सेकंदाला एका व्यक्तीला येतोय स्ट्रोक, तरुण रुग्णांचा प्रमाण वाढतं; डॉक्टरांनी सांगितलं कारण

प्रत्येकी 40 सेकंदाला एका व्यक्तीला येतोय स्ट्रोक, तरुण रुग्णांचा प्रमाण वाढतं; डॉक्टरांनी सांगितलं कारण

प्रत्येकी 40 सेकंदाला एका व्यक्तीला येतोय स्ट्रोक, तरुण रुग्णांचा प्रमाण वाढतं; डॉक्टरांनी सांगितलं कारण

रुग्णालयात दाखल झालेल्या स्ट्रोकच्या एकूण रुग्णांपैकी प्रत्येकी पाचपैकी एक रुग्ण तरुण आहे.

  • -MIN READ Trending Desk Bangalore,Bangalore,Karnataka
  • Last Updated :

    मुंबई, 17 फेब्रुवारी : पूर्वी वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना कोलेस्टेरॉल, डायबेटिसचा त्रास होता अशांना हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोक्सचा धोका होता. मात्र, आता 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्येदेखील हे आजार अधिक सामान्य होत आहेत. बैठी जीवनशैली आणि बदलत्या काळामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अधिक तरुण स्ट्रोकला बळी पडले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्लूएचओ) नोंदीनुसार, स्ट्रोक हा जगभरातील मृत्यूंसाठी जबाबदार असलेला दुसरा सर्वांत मोठा घटक आहे. दरवर्षी अंदाजे 13 दशलक्ष लोक या आजारानं ग्रस्त होतात आणि दरवर्षी अंदाजे 5.5 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतातील स्थितीदेखील अधिक चिंताजनक होत आहे. आपल्या देशात दर 40 सेकंदांना एका व्यक्तीला स्ट्रोक येत आहे. स्ट्रोक म्हणजे काय? क्षणिक इस्केमिक अ‍ॅटॅक किंवा सेरेब्रोव्हॅस्कुलर अॅक्सिडेंट अशी स्ट्रोकची व्याख्या केली जाते. जेव्हा मेंदूला होणाऱ्या रक्त प्रवाहामध्ये अडथळा येतो आणि त्यामुळे मेंदूला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वं मिळत नाहीत, तेव्हा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. ऑक्सिजन आणि पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूतील पेशी काही मिनिटांतच मरण्यास सुरुवात होते. ज्यामुळे मेंदूचं दीर्घकालीन नुकसान, दीर्घकालीन अपंगत्व आणि व्यक्तीचा मृत्यूदेखील होतो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासात असं निदर्शनास आलं आहे की, हा आजार खूप कमी जणांना होत असला तरीही स्ट्रोकचे सर्व प्रकार गृहित धरता त्यापैकी 10 ते 15 टक्के पेशंट हे तरुण असतात. याचा प्रमाणाचा विचार करता त्यातील एक पंचमांश रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागतं. या आजारामुळे मात्र तरुणांचं खासगी आयुष्य उदध्वस्त होतं. हे वाचा -  पायाची किरकोळ दुखापत 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली; मृत्यूचं कारण धक्कादायक मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे होणारा इस्केमिक स्ट्रोक हा स्ट्रोकचा सर्वात सामान्य प्रकार आहे. तरुणांमध्ये स्ट्रोकची इतर प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत - सब्राक्नोइड हॅमरेज (एसएएच) - जेव्हा मेंदूच्या सभोवतालच्या अरक्नोइड मेंब्रेन आणि पिया मॅटरच्या दरम्यानच्या भागात रक्तस्त्राव होतो तेव्हा एसएएच होतो. एन्युरीस्मल फाटणं हे एसएएच होण्याचं सर्वांत सामान्य कारण आहे. इंट्राक्रॅनियल हॅमरेज - जेव्हा मेंदूतील पॅरेन्कीमामधील रक्तवाहिन्या फुटतात किंवा लीक होतात तेव्हा इंट्राक्रॅनियल हॅमरेज होतं. उच्च रक्तदाब हे इंट्राक्रॅनियल हॅमरेज होण्याचं सर्वात सामान्य कारण आहे. स्ट्रोकच्या येण्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या (15-20टक्के) तुलनेत तरुणांवर (40-55 टक्के) या दोन्ही कारणांचा अधिक परिणाम होत असल्याचं आढळलं आहे. स्ट्रोकची लक्षणं काय आहेत? चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या एका बाजूला सौम्य अशक्तपणा जाणवण्यापासून ते अर्धांगवायू होण्यापर्यंत स्ट्रोकची लक्षणं असतात. तरुणांमधील स्ट्रोकची व्याख्या FAST म्हणून केली जाते. ज्याचा अर्थ चेहरा लुळा होणं, हात लुळा होणं, बोलण्यात अडचणी येणं आणि बोलण्यास वेळ लागणं, असा आहे. या शिवाय, अचानक गोंधळ उडणं, बोलण्यात किंवा आकलनात अडचणी येणं, एका किंवा दोन्ही डोळ्यांनी दिसण्यात अडचण येणं, संतुलन किंवा समन्वय गमावणं, चक्कर येणं, चालण्यास त्रास होणं आणि अचानक तीव्र डोकेदुखी होणं, हीदेखील स्ट्रोकची लक्षणं आहेत. जोखमीचे घटक काय आहेत? बैठ्या जीवनशैलीतील वाढ हे स्ट्रोक येण्याचं मुख्य कारण आहे. धूम्रपान, मद्यपान, व्यायामाच्या अभावामुळे वाढलेला बीएमआय, डायबेटिस, उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया, भूतकाळातील एच/ओ स्ट्रोक, कौटुंबिक इतिहास, अॅट्रियल फायब्रिलेशनसह हृमेटिक हार्ट डिसीज आणि गर्भनिरोधक गोळ्या (स्त्रियांतील स्ट्रोकची जोखीम दोन ते पाच पटीने वाढते) यासारखे अनेक घटक जोखीमीचे ठरू शकतात. तणाव, झोप न लागणं आणि पॅकबंद खाद्यपदार्थांचं सेवन हीदेखील काही सामान्य कारणं आहेत ज्यामुळे तरुणांमध्ये स्ट्रोकचं प्रमाण जास्त आहे. हे वाचा -  बोंबला! ‘आता कसा होणार मी नवरा’, तरुणासोबत डॉक्टरांनी भलतंच केलं, आता लग्नाचाही वांदा स्ट्रोकचा धोका कसा कमी करू शकता? 1. पौष्टिक, ताजं आणि प्रक्रिया न केलेले पदार्थ खा. मर्यादित प्रमाणात मिठाचं सेवन करा. असं केल्यास स्ट्रोकसाठी कारणीभूत असलेल्या उच्च रक्तदाब, टाइप 2 डायबेटिस आणि हाय कोलेस्टेरॉलचा धोका कमी होईल. 2. लठ्ठपणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. वजन कमी केल्यानं तुमचा रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. हृदय, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या आणि हाडांमधील ताण कमी होण्यास मदत होईल. 3. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना स्ट्रोकचा धोका दोन ते चार पट जास्त असतो. त्यामुळे धूम्रपान करणं सोडलं पाहिजे. 4. जर तुम्हाला डायबेटिस असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासली पाहिजे. रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहिल्यास स्ट्रोकचा धोका काहीअंशी कमी होतो. 5. जर तुम्हाला याआधी स्ट्रोक आला असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेतली पाहिजेत. नियमित औषधं घेतल्यास दुसर्‍या स्ट्रोकपासून बचाव होऊ शकतो. वेळ फार महत्त्वाची आहे एका मिनिटाचा उशीरदेखील एखाद्या व्यक्तीचं जीवन उध्वस्त करू शकतो. म्हणूनच, गोल्डन अवर्समध्ये स्ट्रोकचं वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास शारीरीक विकृती आणि मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो. आजूबाजूच्या लोकांमध्ये स्ट्रोकच्या लक्षणांबाबत जागृती निर्माण केल्यास त्यांची देखील रुग्णाला वेळेत उपचार मिळवून देण्यात मदत होऊ शकते. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक आला असेल तर तुम्ही तिला स्ट्रोक युनिट आणि कॅथ लॅब (ब्रेन अँजिओ आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी) असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. स्टोक आल्यापासून ते उपचार मिळेपर्यंतचा प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे. लेखक - डॉ. संतोष एन. यू. कन्सल्टंट - न्यूरोसर्जरी आणि एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जरी, अॅस्टर सीएमआय हॉस्पिटल, बेंगळुरू

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात