मुंबई, 10 मार्च- हार्ट अॅटॅक व कार्डिअॅक अरेस्ट येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. रोज याबाबतच्या अनेक घटना आपल्याला ऐकिवात येतात. ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. तरुण वयातील लोकांनाही कार्डिअॅक अरेस्ट होतो. कार्डिअॅक अरेस्ट झाल्यास लगेच उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
हार्ट अॅटॅक व कार्डिअॅक अरेस्ट या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याची लक्षणंही वेगळी आहेत. पण, बऱ्याच जणांना हार्ट अॅटॅक व कार्डिअॅक अरेस्ट या गोष्टी सारख्या वाटतात. त्यांना यातला फरक माहीत नसतो. तर, या दोन्हीतला फरक काय आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. यासंदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय.
कार्डिअॅक अरेस्ट काय आहे?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबतात आणि ते शरीराच्या इतर भागांना रक्तपुरवठा करू शकत नाही, तेव्हा त्या स्थितीला ‘कार्डिअॅक अरेस्ट’ म्हणतात.
(हे वाचा: Health Tips : हार्ट अटॅक आणि स्ट्रोक टाळण्यासाठी तुमच्या आहारातून आत्ताच काढून टाका हे पदार्थ)
कार्डिअॅक अरेस्ट झाल्यावर काय होतं?
कार्डिअॅक अरेस्ट आल्यावर व्यक्ती काही मिनिटांत बेशुद्ध होते. अशा व्यक्तीला लगेच उपचार न मिळाल्यास त्याचं निधन होऊ शकतं.
कार्डिअॅक अरेस्ट होण्याचं कारण काय?
कार्डिअॅक अरेस्टबद्दल सर्वांत भयानक गोष्ट म्हणजे तो कोणालाही कधीही येऊ शकतो. कधीकधी हार्ट अॅटॅकही याचं एक कारण असू शकतं. या शिवाय, जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे स्नायू कमकुवत असतील, तरी त्याला कार्डिअॅक अरेस्ट होऊ शकतं.
हार्ट अॅटॅक म्हणजे काय?
हार्ट अॅटॅक हा कार्डिअॅक अरेस्टपेक्षा खूप वेगळा आहे आणि हा कार्डिअॅक अरेस्टपेक्षा कमी धोकादायक आहे. जेव्हा मानवी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमन्या 100% ब्लॉक होतात, अशा स्थितीत व्यक्तीला हार्ट अॅटॅक येतो.
हार्ट अॅटॅकची लक्षणं?
हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. यापैकी, छातीत दुखणं किंवा छातीत जडपणा जाणवणं हे सर्वांत सामान्य लक्षण आहे. या शिवाय धाप लागणं, घाम येणं किंवा उलट्या होणंही लक्षणं आहेत. ही लक्षणं लगेच किंवा काही तासांनंतर दिसून येतात.
हार्ट अॅटॅक येण्यामागचं कारण
तुमच्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो. आजकाल लोकांच्या खाण्याच्या सवयी विचित्र आहेत. नीट झोप न लागणं किंवा व्यायाम न करणं हेही हार्ट अॅटॅकचं एक कारण असू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Heart Attack, Lifestyle, Lokmat news 18