सध्या बऱ्याच जणांना वजन वाढण्याची समस्या जाणवते. त्यामुळे मोठ्या माणसांचे तर सोडाच आजकाल लहान मुलांमध्ये देखील पोटाची चरबी वाढण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकदा विविध उपाय करून वजन कमी करण्यात यश आले तरी वाढलेली पोटाची चरबी मात्र सहजासहजी कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे या समस्येवर वेळीच आळा घातला नाही तर त्यासोबत ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा झटका, श्वसनाच्या संबंधित आजार निर्माण होतात. तेव्हा पोटाची वाढती चरबी कमी करण्यासाठी दररोज 3 प्रकारच्या बियांचे सेवन केल्याने पोट काही दिवसातच स्लिम होण्यास मदत होईल. चिया सीड्स :
चिया सीड्समध्ये पचनसंस्था बारी करण्याचे गुणधर्म असतात. त्याच्या सेवनाने कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. या बियांमध्ये फायबरमुबलक प्रमाणात आढळते. नाश्त्यात याचे सेवन केल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्ही अनावश्यक पदार्थ खाणे टाळता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. सूर्यफुलाच्या बिया :
सूर्यफुलाच्या बिया या वजन नियंत्रणाच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जातात. ते बारीक करून चहा, सूप किंवा गरम पाण्यात मिसळून त्यांचे सेवन केल्याने आतडे साफ होण्यास मदत होते आणि पचनक्रिया मजबूत होते. सूर्यफुलाच्या बियांमुळे चरबी कमी होते त्यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होतो. अळशीच्या बिया :
आयुर्वेदात अळशीच्या बियांना खूप महत्व आहे. अळशीच्या बिया या शारीरिक सुदृढतेसाठी महत्वाच्या मानल्या जातात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आढळतात. यासोबतच लोह, प्रथिने आणि फायबर देखील मिळतात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिडही आढळते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवून ती काढून टाकते. तुम्ही जवसाच्या बिया बारीक करून दही पराठे, भाज्या किंवा इतर पेयांसह देखील खाऊ शकता.