जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shake for Weight Gain : वजन वाढवायचंय? मग उन्हाळ्यात रोज प्या हे 4 शेक्स, वजन वाढवण्यास होईल मदत

Shake for Weight Gain : वजन वाढवायचंय? मग उन्हाळ्यात रोज प्या हे 4 शेक्स, वजन वाढवण्यास होईल मदत

वजन वाढवायचंय? मग उन्हाळ्यात रोज प्या हे 4 शेक्स, वजन वाढवण्यास होईल मदत

वजन वाढवायचंय? मग उन्हाळ्यात रोज प्या हे 4 शेक्स, वजन वाढवण्यास होईल मदत

कडक उन्हाळ्यात वजन वाढवण्याच्या डायटमध्ये 4 शेक्सचा समावेश केल्यास ते तुम्हाला रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी आणि तुमचे वजन वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अनेकदा लोक त्यांच्या लठ्ठपणामुळे अस्वस्थ होतात. मात्र, काहींना त्यांच्या दुबळ्या शरीराचा म्हणजेच वजन कमी असण्याचा त्रास होतो. तेव्हा असे लोक वजन वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. अनेकदा वजन वाढवण्यासाठी ओव्हर इटिंग सुद्धा करतात. परंतु असे केल्याने त्यांच्या शरीरावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा कडक उन्हाळ्यात वजन वाढवण्याच्या डायटमध्ये 4 शेक्सचा समावेश केल्यास ते तुम्हाला रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी आणि तुमचे वजन वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल. बेरीज शेक :

News18

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात बेरी शेकचे सेवन करू शकता. बेरी शेकची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरीही टाकू शकता. रोज बेरी शेक प्यायल्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. एवोकॅडो शेक :

News18

एवोकॅडोमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे याचे दररोज सेवन केल्याने तुमच्या शरीराचे वजन वाढण्यास मदत होते. एवोकॅडो शेक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही हा शेक डार्क चॉकलेट टाकून बनवू शकता. एवोकॅडोचे तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. केळी शेक :

News18

केळी हे थंड फळ आहे, त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही याचे सेवन करू शकता. केळीचा शेक बनवून प्यायल्याने वजन वाढण्यास मदत होते. केळीमध्ये पुरेशा प्रमाणात कॅलरी आणि फॅट्स असतात. केळीच्या शेकमध्ये तुम्ही 2 ते 3 केळी आणि 2 चमचे ओट्स घालून खाऊ शकता. आंबा शेक :

News18

आंबा हा उन्हाळ्याच्या सीजनमध्ये मार्केटमध्ये येत असतो. तसेच आंबा हा उन्हाळ्यात हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. आंब्यात पुरेशा प्रमाणात  हेल्दी फॅट्स आणि कॅलरीज असतात. मँगो शेक प्यायल्याने तुमचे वजन वाढेल आणि मनही प्रफुल्लित होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात