मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वनस्पतींमुळे माणसाला बुरशीजन्य रोगाचा संसर्ग: भारतात आढळला जगातील पहिला रुग्ण

वनस्पतींमुळे माणसाला बुरशीजन्य रोगाचा संसर्ग: भारतात आढळला जगातील पहिला रुग्ण

प्लांट फंगल डिसीज

प्लांट फंगल डिसीज

कोलकाता येथील 61 वर्षांच्या प्लांट मायकोलॉजिस्ट असलेल्या एका व्यक्तीला दुर्मिळ आजार झाला आहे. या आजाराचं नाव प्लांट फंगल डिसीज अर्थात वनस्पती बुरशीजन्य रोग आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Kolkata [Calcutta], India

  कोलकात, 2 एप्रिल : कोलकाता येथील 61 वर्षांच्या प्लांट मायकोलॉजिस्ट असलेल्या एका व्यक्तीला दुर्मिळ आजार झाला आहे. या आजाराचं नाव प्लांट फंगल डिसीज अर्थात वनस्पती बुरशीजन्य रोग आहे, या आजाराचं निदान झालेली ही जगातील पहिली व्यक्ती आहे. या व्यक्तीला `कॉन्ड्रेस्टेरियम पर्प्युरियम` नावाच्या बुरशीचा संसर्ग झाला आहे. या बुरशीमुळे वनस्पतीला सिल्व्हर लीफ नावाचा आजार होतो. झाडांमधील बुरशीच्या जवळून संपर्कात आल्याने त्याचा संसर्ग मानवामध्ये कसा पसरू शकतो, हे या केसवरून दिसते.

   असं झालं आजाराचं निदान 

  `एनडी टीव्ही`च्या वृत्तानुसार, मेडिकल मायकोलॉजी केस जर्नलच्या अहवालात म्हटलं आहे की, घोगरा आवाज, थकवा आणि गिळण्यात अडचणी यासारखी लक्षणं तीन महिन्यांपर्यंत कायम राहिल्याने हा रुग्ण डॉक्टरांकडे गेला. अभ्यासानुसार, रुग्णाच्या मानेत पॅराट्रॅचियल गळूदेखील झाले होते. पॅराट्रॅचियल गळूमुळे सामान्यतः ताप येणं, घसा खवखवणं, ओडायनोफॅगिया अर्थात अन्ननलिकेला सूज येणं किंवा वेदना होणे आणि मानेतील हाडांच्या खाली सूज येते. रुग्णाच्या पस म्हणजेच पूचे नमुने तपासले असता त्याला बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्याच्या छातीच्या एक्स-रेमध्ये कोणताही संसर्ग दिसून आला नाही. परंतु, त्याच्या मानेचा सीटी स्कॅन केला असताना उजव्या बाजूला पॅराट्रॅचियल गळू असल्याचे दिसून आले.

  अँटिफंगल औषधांचं सेवन 

  `टाईम्स ऑफ इंडिया`च्या वृत्तानुसार, दोन महिने दोन अँटिफंगल औषधं दिल्यानंतर ही व्यक्ती बरी झाली आहे. `या रुग्णाला डायबेटिस, एचआयव्ही संसर्ग, किडनी किंवा इतर कोणताही जुनाट आजार नव्हता. तसेच त्याने इम्युनोसप्रेसिव्ह औषधांचे सेवन केलेले नव्हते. तसेच त्याच्यावर कोणताही आघात झालेला नव्हता. हा रुग्ण व्यवसायाने वनस्पती मायकोलॉजिस्ट आहे. सडणारी सामग्री, मशरुम आणि विविध वनस्पती बुरशी यांच्यावर तो दीर्घकाळ संशोधन करत होता,` असं अभ्यासात म्हटलं आहे.

  तज्ज्ञ काय म्हणतात? 

  संशोधक तसेच कोलकाता येथील अपोलो मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट डॉ. उज्ज्वलिनी रे आणि डॉ. सोमा दत्ता यांनी अहवालात म्हटलं आहे की, `रुग्णाला कॉन्ड्रेस्टेरियम पर्प्युरियमचा संसर्ग झाला आहे. हा एक प्लांट फंगस आहे. यामुळे विशेषतः गुलाब कुळातील वनस्पतींना सिल्व्हर लीफ नावाचा रोग होतो. वनस्पतींच्या बुरशीमुळे माणसाला रोग होण्याची ही पहिलीच घटना आहे,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

  `रुग्ण वारंवार कुजणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्याने त्याला हा दुर्मिळ संसर्ग झाला असावा. या बुरशीजन्य संसर्गाचे निदान मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक मॉर्फोलॉजीवरून स्पष्ट होते. परंतु, संसर्गाचे स्वरूप, प्रसाराची क्षमता आदी गोष्टी निश्चित करणं शक्य झालं नाही,' असं त्यांनी सांगितलं.

  First published:
  top videos

   Tags: Health, Medical