अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 22 जून : एका महिलेने तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल आत्महत्या केली. मुलाच्या जन्मानंतर तिचे शरीर बेडौल झाले होते, त्यामुळे आता तिला नोकरी मिळणार नाही अशी भीती वाटली आणि यातूनच तिने हा टोकाचा निर्णय घेतला. ओकसाना असे या 27 वर्षांच्या महिलेचे नाव होते. ती युक्रेनमधील रहिवासी असून सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये राहत होती. लोकल 18 ने या संपूर्ण प्रकरणावर किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ आदर्श त्रिपाठी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गर्भधारणेदरम्यान एक अशी स्थिती असते. या स्थितीला प्रसुतिपश्चात उदासीनता किंवा पोस्टपर्टम ब्लूज म्हणतात.
या कालावधीत आईच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू असतात. या कालावधीत स्त्रीला नीट झोप येत नाही, जेवता येत नाही, उठता बसताही येत नाही. अशा परिस्थितीत चिडचिड, एकटेपणा आणि भविष्याची चिंता तिला सतावू लागते. आता मुलाची जबाबदारी आली आहे, हे सर्व कसे होणार? असा विचार तिच्या मनात येतो. त्यामुळे हा कालावधी स्त्री आणि मुलासाठी संवेदनशील असतो.
शरीर बेडौल होण्याची भीती - या कालावधीदरम्यान, अनेक वेळा स्त्रिया आपल्या शरीराला आरशात पाहतात. यावेळी त्या आता कशा दिसतील या विचाराने त्यांना खूप वाईट वाटते. तर नोकरीपासून विविध प्रकारच्या भीतीने त्रस्त असलेल्याही काही महिला असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पती आणि महिलेच्या ओळखीच्या आणि कुटुंबातील सदस्यांनी तिला आनंददायी वातावरण देणे सर्वात महत्त्वाचे आहे. तिला यावेळी विशेषत: भावनिक आधाराची सर्वाधिक गरज असते. मात्र, ती न मिळाल्याने अनेकदा स्त्रिया असे पाऊल उचलतात, असे ते म्हणाले. डॉ. आदर्श त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण भारताचा विचार केला तर 100 पैकी 10 टक्के स्त्रिया बर्याचदा अत्यंत वाईट पद्धतीने नैराश्यात, तणावात जातात. त्यामुळे अशा स्त्रीयांना मदत आणि आधार देऊनच या परिस्थितीतून बाहेर काढता येईल. तर लखनऊचे फिटनेस गुरू नितेश त्यागी यांनी प्रसूतीनंतर शरीर कसे फिट करावे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गरोदरपणात महिलांचे वजन वाढते. अशा परिस्थितीत, स्वतःला पुन्हा तंदुरुस्त बनवण्याचा पहिला व्यायाम म्हणजे फुलपाखराचा व्यायाम (butterfly exercise). यामध्ये महिलांनी दोन्ही पायांनी फुलपाखरू उडवण्यासारखे व्यायाम करावा. ही क्रिया त्यांनी 50 ते 200 वेळा करावी. याशिवाय भिंतीचा आधार घेऊन बसण्याचा आणि उभा राहण्याचा व्यायाम करा किंवा हळूहळू पायऱ्या चढण्याचा आणि उतरण्याचा व्यायाम करा. तसेच गरोदरपणातही एखादी महिला धावणे, मॉर्निंग वॉक आणि नृत्य करत असेल, तर शरीरावर जास्त ताण पडू नये म्हणून ते हळूहळू आधीच्या या क्रिया चालू ठेवता येतात. तर अशाप्रकारे स्त्रिया त्यांचे शरीर पुन्हा फिट करू शकतात. मात्र, या सर्व क्रिया नियमित कराव्या, असा नियम आहे, असेही ते सांगतात.