जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका! 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video

तुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका! 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video

तुमच्या मुलालाही मधुमेहाचा धोका आहे.

तुमच्या मुलालाही मधुमेहाचा धोका आहे.

शहरी भागातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यापासून तुमच्या मुलाचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 29 मे :   भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे. लहानांपासून ते मोठ्यांसुद्धा या गंभीर आजारानं घेरलंय.  शहरी भागातील मधुमेहाचा विचार केला असता साधारण पाचपैकी एका व्यक्तीला टाइप 2 प्रकारचा मधुमेह आहे, असे नुकत्याच केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. शहरी भागातील बालकांमधील ‘टाइप 1’ मधुमेहाचे प्रमाण दर वर्षी वाढत असल्याचे समोर आले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे बालकांमधील वाढता मधुमेह ही मोठी समस्या बनली असून, पुढील काळात यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. का वाढले प्रमाण? गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेत अथवा घराच्या आजूबाजूला मैदाने उरलेली नाहीत. मुले शाळेत बसून असतात. घरी आल्यावर टीव्ही, कॉम्प्युटर अथवा मोबाइल हातात घेऊन बसतात. आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. याचबरोबर वाढते जंकफूडचे प्रमाण आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा, चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांना मुलांना सामोरे जावे लागत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

डॉ. तुषार बंडगर यांनी याबा्बत दिलेल्या अधिक माहितीनुसार, ‘आपल्या सर्वांनाच आता माहिती आहे की लहान मुलांना देखील मधुमेह होत असतो मात्र लहान मुलांमध्ये टाईप 1 चा मधुमेह होतो.  यामध्ये इन्सुलिनची तयारी आत मधून होत नसते आणि बाहेरून आपल्याला इन्सुलिन घ्यावं लागतं. सध्या टाईप टू मधुमेह म्हणजे जो प्रौढावस्थेत होणारी प्रक्रिया आता लहान मुलांमध्ये देखील वाढीला लागले आहे. हे सर्व स्थूलतेमुळे बदललेल्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमधील शारीरिक वजनांमध्ये वाढ होत असून लहान मुलांमधील व्यायामाचे खेळण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवतात हे 3 प्रकारचे पिठ! मधुमेहींना माहिती हवेच आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तेलाचे तुपाचे किंवा गोड पदार्थ सेवन केल्यामुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा राहते त्यामुळेच स्थूलता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहार देताना स्थुलता वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन बंडगर यांनी केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात