परमजीत तूर, प्रतिनिधी टोहाना, 12 जुलै : एखाद्या वेळी एखादी घटना, एखादे वाक्य किंवा एखादा अनुभव आपल्या संपूर्ण आयुष्याची स्थिती बदलतो. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. हरयाणा राज्यातील एका डॉक्टरसोबत असाच प्रकार घडला. टोहाना येथील डॉ. शिव सचदेवा यांची कथा अशीच आहे. ते सात वर्षांपासून मोफत सेवा देऊन मानवतेच्या कल्याणासाठी काम करत आहेत. सेवा भारती संस्था संचालित स्वामी दयानंद आरोग्य केंद्रात डॉ. शिव सचदेवा सेवा देत आहेत. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेत स्थानिक लोकांनी त्यांना टोहाना रतन ही पदवी दिली आहे. खासगी रुग्णालय सोडून ते नि:स्वार्थीपणे लोकांची सेवा करत असून लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी सुमारे अर्धा डझन संस्था स्थापन केल्या आहेत.
घरी जाऊन करतात उपचार - डॉ. शिव सचदेवा ज्या रुग्णांना चालता येत नाही अशा रुग्णांची घरी जाऊन उपचार करतात. गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये औषधेही मोफत दिली जातात. डॉ. शिव सचदेवा रजत संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही संसर्गग्रस्त लोकांमध्ये जनजागृती करतात. याशिवाय त्यांना शक्य ती सर्व मदतही करतात. जन जागरण संस्थेची स्थापना - डॉ. शिव सचदेवा यांनी सांगितले की, 1984 मध्ये त्यांनी बीएमएमएस पदवी घेतली होती आणि ते त्यांचे खासगी दवाखाना चालवत होते. या दरम्यान गरजू लोकांना मदत करण्यासाठी जन जागरण संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचवेळी पूरग्रस्तांनाही मदत करण्यात आली. त्यांनी केवळ आरोग्य सेवाच दिली नाही तर गरजूंसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. यानंतर सामाजिक कार्य पुढे नेले पाहिजे असा विचार केला. यामुळे त्यांनी आपला दवाखाना सोडून ते समाजसेवा म्हणून ते लोकांवर मोफत उपचार करू लागले.
HIV बाबत लोकांना करतात मार्गदर्शन - डॉ. शिव सचदेवा यांनी 2004 मध्ये एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी रजत संस्थेची स्थापना केली. त्यावेळी एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने आत्महत्या केली होती. डॉक्टर सचदेवा म्हणाले की, त्या व्यक्तीने जर आमच्या संस्थेशी संपर्क साधला असता तर त्यांना वाचवता आले असते. त्यांना आपले आयुष्य चांगले जगता आले असते. पण त्यांच्या मृत्यूचा माझ्यावर खूप परिणाम झाला, त्यानंतर आम्ही आमच्या संस्थेची मोहीम तीव्र केली आणि शाळा, महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करून अशा लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये जागरुकतेमुळे केसेस कमी होत आहेत. लोकांमध्ये HIV बाबत जागरुकता निर्माण झाली आहे. आता एचआयव्हीबद्दल लोकांमध्ये कोणताही संभ्रम किंवा भीती नाही. तो वेगाने बरा होत आहे. आपला शेवट मृत्यू आहे अशी पूर्वीची लोकांची धारणा होती. आता तसे नाही. आता औषधेही आल्यामुळे तो सामान्य जीवन जगू शकतो. डॉ.सचदेवा यांच्या म्हणण्यानुसार गेली अनेक वर्षे ते पूर्णपणे निस्वार्थपणे काम करत आहेत. अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करून त्यांनी लोकांना मदत केली. डॉ.सचदेवांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले आहे.