जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : पावसाळ्यात लहान मुलांमध्ये उद्भवतायत त्वचेच्या समस्या? तज्ञांनी सांगितलेले 'हे' उपाय करून पाहा

Skin Care : पावसाळ्यात लहान मुलांमध्ये उद्भवतायत त्वचेच्या समस्या? तज्ञांनी सांगितलेले 'हे' उपाय करून पाहा

पावसाळ्यात लहान मुलांमध्ये उद्भवतायत त्वचेच्या समस्या? तज्ञांनी सांगितलेले 'हे' उपाय करून पाहा

पावसाळ्यात लहान मुलांमध्ये उद्भवतायत त्वचेच्या समस्या? तज्ञांनी सांगितलेले 'हे' उपाय करून पाहा

पावसाळ्यात मुलांना त्वचेच्या ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या आणि त्यावरील उपचार यांची माहिती घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    पावसाळ्यात वातावरणातली आर्द्रता आणि ओलावा वाढल्यामुळे लहान मुलांना त्वचेच्या विविध समस्या जाणवू शकतात. पावसाळ्यात मुलांना त्वचेच्या ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या आणि त्यावरील उपचार यांची माहिती घेऊ या. डीएनए स्किन क्लिनिक आणि वेलनेस सेंटरच्या संस्थापक डॉ. प्रियांका रेड्डी (एमबीबीएस, एमडी, डीव्हीएल) यांनी ही माहिती दिली आहे. • फंगल इन्फेक्शन : पावसाळ्यातली उबदार आणि दमट हवा नायटा, अ‍ॅथलीट्स फूट आणि डायपर रॅशेस यांसारख्या बुरशीजन्य संसर्गासाठी अनुकूल वातावरण तयार करते. • प्रिक्ली हीट : या समस्येला घामोळं किंवा मिलिअ‍ॅरिया म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हा घामाच्या नलिका ब्लॉक होतात तेव्हा ही समस्या निर्माण होते. त्यामुळे त्वचेवर लहान, लाल किंवा त्वचेच्या रंगाची पुरळ येते. शरीराच्या ज्या भागात घाम जमा होतो (मान, काख, मांडीचा सांधा आणि चेहरा) त्या ठिकाणी ही पुरळ येते. • एक्जिमा फ्लेअर-अप्स : एक्जिमा असलेल्या मुलांना पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे फ्लेअर-अप्सची समस्या येऊ शकते. यामुळे गंभीर परिस्थितीमध्ये सेकंडरी बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    • अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन : पावसाळ्यात बुरशी, धुळीचे कण आणि परागकण यांसारख्या अ‍ॅलर्जिक घटकांमध्ये वाढ होऊ शकते. अ‍ॅलर्जी असलेल्या मुलांना त्वचेवर उठणारं पित्त, खाज सुटणं किंवा पुरळ उठणं यांसारख्या अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन्स होऊ शकतात. • बॅक्टेरिअल इन्फेक्शन्स : पावसाळ्यात बॅक्टेरियामुळेही स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. उदाहरणार्थ, इम्पेटिगो हे एक संसर्गजन्य बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे. त्यामुळे तोंड आणि नाकाभोवती लाल फोड किंवा पुरळ येतं. • खरूज : हा त्वचेचा एक संसर्गजन्य विकार आहे. तो पावसाळ्यात उद्भवू शकतो. पावसाळ्यात त्वचेच्या या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी खालील उपाय करता येतात : • त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा : मुलांना नियमितपणे आंघोळ घाला आणि त्यांचं अंग, विशेषत: घाम येण्याची शक्यता असलेल्या भागात पूर्णपणे कोरडं होईल खात्री करा. • सौम्य, पीएच-संतुलित क्लीन्सर वापरा : हार्श साबणाचा वापर टाळा. त्वचेची जळजळ टाळण्यासाठी सौम्य, हायपोअ‍ॅलर्जेनिक क्लीन्सरची निवड करा. • सैल, श्वास घेता येईल असे कपडे घाला : लाइटवेट कपडे निवडा. त्यामुळे त्वचेशी हवेचा संपर्क राहील आणि घाम शोषला जाईल. Hair Care Tips : कमी वयात डोक्यावर टक्कल पडतंय? हे घरगुती उपाय करून दिसेल आश्चर्यकारक परिणाम • वातावरण कोरडं ठेवा : घरामध्ये कोरडं वातावरण राखण्यासाठी डिह्युमिडिफायर किंवा एअर कंडिशनर वापरा. त्यामुळे बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते. • वैयक्तिक वस्तू शेअर करणं टाळा : टॉवेल, कपडे किंवा इतर वैयक्तिक वस्तू शेअर न करण्याचा सल्ला मुलांना द्या. असं केल्यास संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल. • अँटीफंगल पावडर वापरा : पावसाळ्यात, विशेषत: बॅक्टेरिअल इन्फेक्शनची शक्यता असलेल्या भागात अँटीफंगल पावडर वापरा. ही पावडर त्वचा कोरडी ठेवण्यास आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत करू शकते. • बालरोगतज्ज्ञ किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या : मुलांना पावसाळ्यात सतत किंवा गंभीर स्वरूपाच्या त्वचेच्या समस्या उद्भवत असतील, तर अचूक निदान आणि योग्य उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, की समस्येला प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे. म्हणून पावसाळ्यात स्वच्छता राखणं आणि आवश्यक सावधगिरी बाळगणं हे मुलांच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात