जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नापूर्वी संभोग करण्याची परवानगी, परदेशात नाही देशातच आहे ही प्रथा, काय आहे हा प्रकार?

लग्नापूर्वी संभोग करण्याची परवानगी, परदेशात नाही देशातच आहे ही प्रथा, काय आहे हा प्रकार?

लग्नापूर्वी संभोग करण्याची परवानगी, परदेशात नाही देशातच आहे ही प्रथा, काय आहे हा प्रकार?

पाश्चिमात्य देशांमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे सामान्य आहे. पण आपल्या देशात परंपरांना मोठं स्थान आहे

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

छत्तीसगढ, 15 मार्च : पाश्चिमात्य देशांमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे सामान्य आहे. पण आपल्या देशात परंपरांना मोठं स्थान आहे तिथे अनेक लोक अशा गोष्टी स्वीकारत नाहीत. कॉस्मोपॉलिटन कल्चरची सवय झालेल्या तरुणांचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे नाही. अनेक सर्वेक्षणांमध्ये असेही समोर आले आहे की, अनेकांनी लग्नापूर्वी सेक्स केले आहे. मात्र शहरांतील तरुणांनाच या संस्कृतीची सवय होत असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. पण आपल्या देशातील दुर्गम भागातही अशीच परंपरा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिथे तरुणांना लग्नाआधी सेक्स करता येतो.

जाहिरात

नक्षलग्रस्त छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यांमध्ये गोंड आणि मुरिया या भागात आदिवासी राहतात. त्यांच्या चालीरीती आणि परंपरा थोड्या वेगळ्या आहेत. भारताच्या इतर भागातील लोकांसाठी हे खूप आश्चर्यकारक आहेत. सर्वसाधारणपणे सार्वजनिक ठिकाणी लैंगिकतेबद्दल बोलणे ही आपल्या देशात मोठी चूक मानली जाते. परंतु या आदिवासी जमातींमध्ये ते सामान्य आहे. प्रेमी एकत्र सेक्स करतात. याबाबत तिथे खुल्याने चर्चाही केली जाते.

बापरे बाप! आता याला काय म्हणावं? बाळाला पाहून आईबाबाला धक्का, नर्स-डॉक्टरही शॉक

छत्तीसगडमधील या आदिवासी जमाती घोटूल नावाची परंपरा पाळतात. घोटूल म्हणजे बांबूच्या मोठ्या खांबांनी बनवलेली रचना. हे शहरी भागातील नाईट क्लबसारखे आहेत. तरुण-तरुणी एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि मजा करण्यासाठी येथे येतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणतेही मूल घोटूलला जाऊ शकते.

तेव्हापासून पालक त्यांना घोटूलला पाठवू लागतात. ते घोटूलमध्ये जाऊन काहीही करायला मोकळे असतात. घोटुलमध्ये एकमेकांना समजून घेतल्यानंतर.. विवाहापूर्वी तरुण-तरुणी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. सेक्समध्ये गुंतू शकतात. येथे त्यांना कोणत्याही सामाजिक दबावाशिवाय जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

जाहिरात

घोटूलमध्ये तरुण-तरुणी गाणी गातात आणि एकमेकांसोबत नाचतात. तरुण पुरुष त्यांच्या आवडीच्या तरुणीला खास बांबूपासून बनवलेल्या गोल डोक्यात घालण्याची रिंग देतात. त्या रिंग तिच्या डोक्यात ठेवल्या जातात. तरुणीला ते आवडले तर.. ठेवलं जातं नसेल तर ते काढले जाते. केसात कंगवा ठेवला तर तरुणीला तरुण आवडतो. मग ते एकत्र राहू शकतात. एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवता येतो.  

जाहिरात
या गावात राहण्यासाठी सरकारच देतंय 49 लाख रुपये; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर

काही महिन्यांनंतरही जर हे दोघे एकमेकांना आवडत असतील तर दोन्ही कुटुंबातील वडीलधारी मंडळी एकत्र येत लग्न लावून देतात. काहींना सहवासानंतर गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. असे बरेच लोक आहेत ज्यांनी गरोदरपणात लग्न केले. घोटूलमधील प्रौढ शिक्षणाविषयी जागृतीही दिली जाते. संभोगाविषयीचे समजही दूर केले जातात. या परंपरेमुळे आदिवासी भागात लैंगिक छळ होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत असा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात