मुंबई, 14 जून : चाळिशीनंतर चष्मा लागणं ही बाब साहजिक असली तरी आजकाल कमी वयातच मुलांना चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. फक्त अनुवंशिकताच त्यास कारणीभूत नाही तर सतत टीव्ही आणि मोबाईलचा वापरसुद्धा त्यास कारणीभूत ठरत आहे. लहान वयात चष्मा लागण्याचे गंभीर परिणाम मुलांच्या भविष्यावर नक्कीच पडतात. अनेक तरुण-तरुणी गरज नसताना फॅशन म्हणून चष्मा वापरतता, मग त्याची इतकी सवय होते की त्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. काही घरगुती उपचार, डोळ्यांची योग्य निगा आणि सकस आहार घेतल्यास तुमचा चष्मा लवकर सुटू शकतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती सोपे उपाय सांगणा आहोत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? खा ‘या’ भाज्या 1 - पहाटे अनवाणी पायाने दव पडलेल्या गवतावर चालण्याने चष्मा सुटतो. 2 - दररोज सकाळी अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याने डोळ्यांचा नंबर कमी होतो. 3 - रात्री झोपण्याआधी पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने किंवा शुद्ध तुपाने मालिश करावी. 4 - कृष्णतुळशीच्या पानांचा रस 15 दिवस डोळ्यांमध्ये टाकल्यास रातांधळेपणा कमी होतो. 5 - सूर्यफुलांच्या बियांचे सेवन केल्यास ते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. चिरतरुण दिसण्यासाठी मुलींनी घ्यावी ‘ही’ काळजी; जाणून घ्या 6 सोप्या टिप्स 6 - डोळ्यांसाठी केळी, ऊस, पपई ही फळं अत्यंत गुणकारी आहेत. 7 - गुलाब जलाचे दोन-दोन थेंब दररोज दोन्ही डोळ्यांत टाका फरक जाणवेल. 8 - दररोज सकाळी उठल्यावर लिंबाचा रस कोंबट पाण्यात टाकून प्यायल्याने डोळ्यांध्ये तेज येतं. 9 - अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर सूज येते. त्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. 10 - काकडी ही थंड असते. काकडीच्या चकत्या कापून डोळ्यांवर ठेवल्यास चष्म्याचा नंबर हळूहळू कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.