बहुतेक लोकांना असं वाटतं की ऑरेगॅनो शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण, ओरेगॉनचा केवळ फायदाच होत नाही तर, बर्याच वेळा त्रासही होतो.
जास्त आणि सतत ओरेगॅनो खाणं टाळावं. दररोज किंवा जास्त प्रमाणात ओरेगॅनो खाण्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. जे हायपोग्लिसेमियाच्या आजाराने त्रस्त आहेत अशांनी ओरेगॅनो खाऊ नये.
जास्तवेळा ओरेगॅनो खाल्ल्याने किंवा त्याचा त्वचेवर थेट वापर केल्याने स्किन एलर्जीचा धोका संभवतो. जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही स्किन एलर्जी होते.
सतत ओरेगॅनो खाल्ल्यामुळे पोटाच्या तक्रारी होण्याची शक्यता असते. यामुळे पोटदुखी,अपचन,गॅस,बद्धकोष्ठता तसंच ओटीपोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.
ओरेगॅनो जास्त प्रमाणात खाल्लास काही जखम झाल्यास जास्त रक्तस्त्रावा होण्याची समस्या आहे. ज्यांना रक्तस्त्राव किंवा जखम झाल्यामुळे रक्तस्त्राव बंद न होण्यास त्रास होत असेल त्यांनी ओरेगॅनो खाणं टाळलं पाहिजे.
गरोदरपणात ओरेगॉन खाणं टाळलं पाहिजे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जास्त ओरेगॅनो खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते,ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.