मुंबई, 22 डिसेंबर: हिवाळ्यामध्ये चेहऱ्याप्रमाणे आपल्या डोक्याची त्वचाही कोरडी होत असते. त्यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाम हे अधिक असतं. काही वेळा हे प्रमाण अधिक वाढतं आणि मग अंगावर कोंडा पडण्याएवढा होतो. कोंड्यामुळे मुरुम येणं, सोयासिस, केस गळण्याचा धोका असतो. त्यामुळे हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात कोंडा कमी करण्यासाठी काही खास घरगुती उपाय आणि काळजी हिवाळ्यात लहक्या कोमट पाण्याचा वापर केस धुवण्यासाठी करावा. केसांना हेअर कंडिशनिंग आवर्जुन करावं. त्यामुळे केसं रफ होत नाहीत. कापूर हे अॅन्टीबॅक्टेरियल म्हणून ओळखले जाते. खोबरेल तेलामध्ये थोडासा कापूर विरघळवून या कोमट तेलानं केसांना मालिश करावी. दुसऱ्या दिवशी अथवा दोन तासांनी केस धुवून टाकावे. वाचा- हिवाळ्यातही दिसाल फॅशनेबल, फॉलो करा या सोप्या टिप्स केसांची मजबूती वाढवण्यासाठी आणि कोंडा घालवायचा असेल तर 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा. सकाळी ही मेथी वाटून त्याची पेस्ट केसांना लावावीअर्ध्या तासानंतर आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. डोक्यामध्ये शाम्पू अथवा कंडीशनर राहणार नाही नीट धुतला जाईल याची काळजी घ्या. शिकेकाई पावडर वापरणाऱ्यांनीही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आंबट दही केसांना लावलं तरीही केसांमधला कोंडा कमी होतो आणि केसांना वॉल्यूम येण्यास मदत होते. केसांच्या मुळांना कडुनिंबाचा रस लावला तरीही डोक्याला कोंड्यानं येणारी खाज कमी होते. ते शक्य नसेल तर नुसता कडुनिंबाचा पाला उकळत्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने डोकं स्वच्छ धुवा. अनेक कारणांमुळे तुमच्या केसांत कोंडा होऊ शकतो. केसांची निगा न राखल्यास, धूळ, प्रदूषण, केसांना अति तेल लावल्यानं अथवा तेल अजिबात न लावल्यानंही त्वचा कोरडी होते. मानसिक तणाव किंवा आहार नीट नसला तरीही त्याचा परिणाम आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावर होत असतो. अशावेळी फक्त बाह्य उपाय करून चालत नाही तर अंतर्गत काही गोष्टी बदलणं आवश्यक असतं. जर आहारात हिवाळ्यात स्निग्ध पदार्थ आणि फळांचं सेवन करणं आवश्यक असतं. पाणी भरपूर पिणं आणि शक्य असेल तर आवश्यक तितका पोषक आहार घेतल्यानंही केसांच्या समस्या दूर होतात. कोंड्याचं प्रमाण अति असेल आणि वारंवार डोक्यात खास येत असेल तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं शाम्पू वापरावा. काही वेळा शाम्पू सूट न झाल्यानेही कोंडा होण्याचा धोका असतो. वाचा- फार विचार करू नका, नवीन वर्षात मित्रांसोबत या 6 अडवेंचर ट्रीपवर एकदा नक्की जा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







