• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Women Health : महिलांमध्ये अशी असतात हृयदविकाराची लक्षणं; त्याकडं दुर्लक्ष करणं पडेल महागात

Women Health : महिलांमध्ये अशी असतात हृयदविकाराची लक्षणं; त्याकडं दुर्लक्ष करणं पडेल महागात

Women Heart Health: स्त्रिया ज्या प्रमाणात किंवा जितका वेळ तणावात असतात किंवा त्यापासून त्यांना जो त्रास होतो, त्याकडं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. कधी कधी याविषयी कोणाशी संवाद न झाल्यानं अशा बाबी त्यांच्या जवळच्या लोकांच्या लक्षातही येत नाहीत.

 • Share this:
  नवी दिल्ली,09 नोव्हेंबर : हृदयविकाराची लक्षणं पुरुषांइतकी महिलांमध्ये (Women) स्पष्टपणे दिसत नाहीत. याचा अर्थ असा की जर पुरुषांना हृदयाची समस्या असेल तर, हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यानं छातीत दुखणं (Angina - ischemic chest pain) यासारखी विशिष्ट लक्षणं दिसू शकतात. ती सहज लक्षातही येऊ शकतात आणि योग्य उपचार आणि काळजी सुरू केली जाऊ शकते. मात्र, ही समस्या स्त्रियांमध्ये उद्भवते, तेव्हा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यानंतर हा आजार आढळून येईपर्यंत तो इतका गंभीर होतो की, दर तीनपैकी एका महिलेचा मृत्यू हृदयविकारामुळं (heart disease) होतो. जागरूकतेचा अभाव कार्डिओ व्हॅस्कुलर डिसीजच्या (CVD) प्रतिबंधाबाबत महिलांमध्ये जागृतीचा (Women Heart Health) अभाव आहे. अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे महिलांमध्ये या आजाराचा धोका वाढतो. स्त्रिया ज्या प्रमाणात किंवा जितका वेळ तणावात असतात किंवा त्यापासून त्यांना जो त्रास होतो, त्याकडं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. कधी कधी याविषयी कोणाशी संवाद न झाल्यानं अशा बाबी त्यांच्या जवळच्या लोकांच्या लक्षातही येत नाहीत. या कारणास्तव, पुरुषांपेक्षा स्त्रियांना सीव्हीडीचा धोका वाढतो. तणावासोबतच आहाराचं प्रमाण आणि गुणवत्ता यासारख्या इतर घटकांचाही महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय ज्या महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), प्रीक्लेम्पसिया, गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि मधुमेह असतो, त्यांनी हृदयाची काळजी घ्यावी. हे वाचा - ‘मुलांपेक्षाही ती कुत्र्यावरच जास्त प्रेम करते’; पतीनं अजब समस्या सांगत मागितला सल्ला नियमित तपासणी महिलांनी हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. कोणतीही स्पष्ट लक्षणं आहेत की नाही, जोखमीचं मूल्यांकन करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. जर हा आजार योग्य वेळी आढळून आला तर, महिलांमध्ये CVD ला चांगल्या प्रकारे प्रतिबंध करता येऊ शकतो. हे वाचा - पॅक केलेल्या मालाबाबत आता 1 एप्रिलपासून नवीन नियम; MRP सोबत युनिटची किंमतही लिहिणं बंधनकारक या बाबी लक्षात ठेवा जेव्हा हृदयविकाराबद्दल जाणून घेणं कठीण असतं, तेव्हा तुमचा आहार आणि जीवनशैली योग्य ठेवा. महिलांनी त्यांच्या आहारात फळं, भाज्या आणि फायबर जास्त असलेले पदार्थ आणि हृदय निरोगी ठेवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. तसंच, तणावापासून दूर राहावं. (या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: