नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, प्रथिने (protein) त्यापैकी एक महत्त्वाचा घटक आहेत. स्नायू तयार करण्यात आणि मजबूत राखण्यात प्रथिनं महत्त्वाची भूमिका बजावतात. इतकेच नाही तर वजन कमी करण्यासाठी, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मजबूत हाडे तयार करण्यात हे मॅक्रोन्यूट्रिएंट महत्त्वाची भूमिका बजावते. भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा, मांस, चीज इत्यादी आहारातील विविध गोष्टींमधून पुरेशा प्रमाणात प्रथिनं आपल्याला सहज मिळू शकतात. पण जास्त प्रशिनं पोटात जाणंही धोकादायक ठरू शकते.
विविध संशोधनातून असं दिसून आलं आहे की, शरीराच्या वजनासाठी प्रति किलोग्रॅम एक ग्रॅम प्रथिने पुरेसे आहे, परंतु जेव्हा शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कार्बोहायड्रेट किंवा चरबीच्या तुलनेत खूप जास्त होते, तेव्हा ही स्थिती 'प्रोटीन पॉयझनिंग' (protein poisoning) होऊ शकते. प्रोटीन पॉयझनिंग शरीरासाठी किती घातक ठरू शकते हे जाणून घेऊया.
मूड विकार
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या मते, जे लोक वर्षभर जास्त प्रमाणात प्रथिनं आणि फार कमी कार्बोहायड्रेट घेतात त्यांच्यात नकारात्मक भावना, मूड स्विंग, नैराश्य आणि चिंता वाढण्याचा धोका असतो. मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनची पातळी जास्त प्रमाणात प्रथिनं आणि कर्बोदकांच्या कमतरतेमुळे कमी होते, म्हणूनच प्रथिनांचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे.
हे वाचा - ‘सुशांत आता आमच्यामध्ये असता तर..’ ‘छिछोरे’च्या दिग्दर्शकाने सांगितली मनाला चटका लावणारी गोष्ट
श्वासाची दुर्गंधी
केटोजेनिक आहार कार्बोहायड्रेट्सपासून पूर्णपणे दूर राहण्याची शिफारस करते, शरीरात केटोसिसची स्थिती निर्माण करू शकते. ही प्रक्रिया सर्व संचयित कार्बोहायड्रेट्स बाहेर टाकते आणि ऊर्जेसाठी चरबी जाळण्यास सुरुवात करते, ज्यामुळे दुर्गंधी येते. म्हणून, शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने यांचे प्रमाण नियंत्रित करणे गरजेचं आहे.
निर्जलीकरण समस्या
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन खूप आवश्यक आहे. मात्र, प्रथिनांचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढल्यामुळे चयापचय क्रिया प्रभावित होऊ शकते. अशा स्थितीत पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक पोषक घटक लघवीतून बाहेर पडू लागतात. म्हणूनच, तज्ज्ञ पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याची शिफारस करतात.
हे वाचा - 12 वर्षांच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी वडिलांचाच केला खून; कारण ऐकून चक्रावून जाल
कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते
हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनांचे सेवन करण्याची शिफारस केली जात असली तरी त्याचे जास्त सेवन करणे देखील धोकादायक ठरू शकते. अंडी, दुग्ध आणि कुक्कुट यासारख्या प्रथिनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाणही जास्त असते, म्हणून जेव्हा तुम्ही या पदार्थांचे सेवन वाढवता तेव्हा चरबीची पातळीही वाढते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips