Home /News /lifestyle /

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आळूची पानं आहेत गुणकारी; त्यांचा आहारात असा करा उपयोग

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आळूची पानं आहेत गुणकारी; त्यांचा आहारात असा करा उपयोग

आजकाल प्रत्येक तिसरा किंवा चौथा माणूस खराब कोलेस्टेरॉलच्या (Cholesterol) त्रासाचा सामना करत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर जीवनशैलीत बदल आणि आहारात सुधारणा करण्याची शिफारस करतात.

    मुंबई, 03 ऑक्टोंबर : चुकीची जीवनशैली आणि जंक फूड कल्चरमुळं लोकांच्या आरोग्याच्या खूप समस्या निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे कोलेस्टेरॉलची समस्या. आजकाल प्रत्येक तिसरा किंवा चौथा माणूस खराब कोलेस्टेरॉलच्या (Cholesterol) त्रासाचा सामना करत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर जीवनशैलीत बदल आणि आहारात सुधारणा करण्याची शिफारस करतात. विशेषतः जंक फूड टाळणे खूप महत्वाचे आहे. सामान्य व्यक्तीसाठी कोलेस्टेरॉलची पातळी 200 mg/dL पेक्षा कमी असणे चांगले मानले जाते. तर यापेक्षा जास्त असल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्हालाही वाढत्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात आळूच्या पानांचा समावेश करा. जागरण न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, वाढत्या कोलेस्टेरॉलला आळूच्या पानांच्या (Taro Leaves To Control Cholesterol) सेवनानं नियंत्रित करता येतं. आळूची पाने आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया. हेल्थलाइनच्या मते, आळूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लो कार्ब, लो कॅलरी, हाय फायबर इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते. आळूची पाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि वजन कमी करते. हे त्वचेसाठी देखील चांगले आहे. कच्ची पाने विषारी असतात आळूची पानं खाताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ते पूर्णपणे शिजलेले आहेत का? खरं तर, त्यात उच्च ऑक्झलेट असते, ज्यामुळे मुतखड्याची समस्या उद्भवू शकते. अनेक हिरव्या पालेभाज्यांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण असले तरी त्यांचे प्रमाण खूप कमी असते. आळूच्या नवीन पानांपेक्षा जुनी पाने आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आहेत. हे वाचा - फेसबुक पोस्ट पडली चांगलीच महागात; अचानक गायब झालं महिलेच्या कारमधील पेट्रोल, काय आहे प्रकरण? स्वयंपाक करताना काळजी घ्या जेव्हा तुम्ही खाण्यासाठी आळूची पानं वापरता तेव्हा त्यांना किमान अर्धा तास उकळणे आवश्यक असते आणि जर तुम्ही ते बेक करत असाल तर ते किमान 1 तास बेक करावे. याशिवाय नवीन पानांऐवजी जुनी झालेली पाने खाण्यासाठी चांगली असतात. हे वाचा - 50000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन या Two Wheeler, कोणत्या आहेत या बजेट इलेक्ट्रिक बाईक्स? कोलेस्टेरॉल कमी करा असे आळूची पानं धुवून, वाळवून आणि बारीक करून त्याची पावडर बनवा आणि दूध किंवा पाण्यात मिसळून दररोज सकाळी किंवा संध्याकाळी प्या. यामुळे कोलेस्टेरॉल सहजपणे नियंत्रित करता येते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या