नवी दिल्ली,09 ऑक्टोबर : सूर्यफुलं दिसायला जितकी सुंदर असतात, तेवढ्याच त्याच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठीही या बियांचा वापर होतो. याशिवाय त्यांचे इतर अनेक फायदे (Health Benefits Of Sunflower Seeds) आहेत.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिनं, अँटी-ऑक्सिडंट्स, जस्त (झिंक), पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी6 आणि आरोग्यादायी स्निग्ध पदार्थ (Healthy Fats) असतात. त्यांचा आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं.
वजन घटवण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक खाद्यपदार्थ, फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करतात. सूर्यफुलाच्या बिया त्यापैकीच एक आहेत. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर याचा तुमच्या दैनंदिन आहारात नक्कीच समाविष्ट करा.
रक्तदाब कमी करतं
रक्तदाबाची तक्रार असेल तर याचा आहारात समावेश करा. यामुळं रक्तदाबाची पातळी कमी होईल. त्यात असलेलं पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब सामान्य ठेवतं.
मेंदूसाठी आवश्यक
सूर्यफुलाचं बियाणं मन:स्थिती आणि मेंदू दोन्हींसाठी फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन बी मेंदूचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं.
त्वचेसाठी प्रभावी
प्रत्येकाला चमकदार त्वचेची गरज असते. त्यात असलेले पोषक घटक त्वचेला चमकदार बनवतात. कारण त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतं. याशिवाय सूर्यफुलाच्या बिया सूर्याच्या किरणांच्या हानिकारक प्रभावांपासून त्वचेचं रक्षण करतात.
आहारात कसा समावेश करावा?
आपण भाजलेलं सूर्यफूल बियाणं आपल्या सूप, मफिन, केक ब्रेड, तसंच सॅलड्स आणि पास्तामध्ये घालून खाऊ शकता. याशिवाय, सूर्यफुलाच्या एक ते दोन चमचे बिया संध्याकाळच्या चहाबरोबर नाश्ता म्हणूनही घेता येतात. सूर्यफुलाच्या बिया तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र, या बियांच्या अतिसेवनामुळं नुकसानही होऊ शकतं. सूर्यफूल बियांमध्ये कॅलरीज आणि सोडियम तुलनेनं जास्त असतं. तसंच, सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅडमियमचं प्रमाण जास्त असल्यानं याचं जास्त सेवन केल्यानं मूत्रपिंडाचं नुकसान होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sunflower