जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Side Effects Of Rice: दररोज जेवताना भात खाताच ना? भाताविषयीच्या या गोष्टी अनेकांना माहीत नाहीत

Side Effects Of Rice: दररोज जेवताना भात खाताच ना? भाताविषयीच्या या गोष्टी अनेकांना माहीत नाहीत

डायबेटिस झालेल्या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कायम असतो. हृदयरोग असलेल्या लोकांना काळे तांदूळ एका औषधाप्रमाणेच आहेत.

डायबेटिस झालेल्या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कायम असतो. हृदयरोग असलेल्या लोकांना काळे तांदूळ एका औषधाप्रमाणेच आहेत.

Side Effects Of Rice: शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे रोज भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात मर्यादित प्रमाणात खावा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 फेब्रुवारी : भात किंवा तांदळाचे पदार्थ खायला अनेकांना आवडतात. काही लोक जेवणात रोटीऐवजी फक्त भातच खातात. खरंतर रोटी बनवण्यापेक्षा भात बनवणं खूप सोपं आहे. काही लोक असे असतात जे भाताला हातही लावत नाहीत, कारण त्यांना भात खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती असते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मसूर, राजमा, छोल्यांसोबत भात खाणे बहुतेकांना आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की, जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. आज आपण भात खाण्याचे दुष्परिणाम (Side effect of rice) जाणून घेऊ. पोट फुगणे जास्त भात खाल्ल्यानं पोट लवकर भरते आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. भात खाल्ल्यानंतर लगेच झोपणं योग्य नाही. मात्र, तांदळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर पचते. त्यामुळे आपल्याला पुन्हा भूक लागायला लागते आणि आपण दिवसभर काही ना काही खात राहतो. यामुळे आपण जास्त खात राहतो. साखरेची पातळी वाढते भातामध्ये कॅलरीज जास्त असतात. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना भात न खाण्याचा किंवा कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा - Onion Hacks: किचनपासून कारपर्यंत.. कांद्याचे इतके फायदे यापूर्वी तुम्हाला कोणी सांगितले नसतील वजन वाढणे शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे रोज भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात मर्यादित प्रमाणात खावा. गॅस समस्या जर तुम्हाला भात खायला आवडत असेल तर पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता. हा तांदूळ जास्त आरोग्यदायी आहे. पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त नसते. यामुळे भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. कधीकधी पोट जड आणि फुगलेले देखील दिसते. हे वाचा -  कांदा-लसूण खाल्ल्यानंतर चार-चौघात तोंड उघडण्याची होते पंचाईत? दुर्गंधी घालवण्याचे हे आहेत उपाय शरीर सुस्तावणे ऑफिसमध्ये किंवा घरी जेवणाच्या वेळेत पोटभर भात खाल्ल्यास जेवल्यानंतर काही वेळातच झोप येऊ लागते. असे होण्याचे कारण म्हणजे तांदूळ शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो. भात खाल्ल्याने शरीर सुस्त होऊन आळस वाढतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात