मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cooking Oil : तुम्हीही खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा वापरता? आरोग्यावर होतात हे घातक परिणाम

Cooking Oil : तुम्हीही खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा वापरता? आरोग्यावर होतात हे घातक परिणाम

Side Effects Of Reuse Cooking Oil : स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्यास त्यात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. त्यामुळे शरीरात जळजळ होण्याची शक्यता वाढते आणि जुनाट आजारही होऊ शकतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर : भजी-पकोडेसारखे खाद्य पदार्थ तळल्यानंतर आपण उरलेले तेल साठवून ठेवतो आणि पुन्हा भाज्यांमध्ये वापरतो. पण तेलाचा पुन्हा-पुन्हा वापर केल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? अशा पद्धतीने खाद्यतेल पुन्हा-पुन्हा वापरल्याने त्याचे आरोग्याला नुकसान होते. याबाबत जाणून (Side Effects Of Reuse Cooking Oil) घेऊया.

सायंटिफिक इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, काही संशोधनात असे आढळून आले आहे की, स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्यास त्यात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. त्यामुळे शरीरात जळजळ होण्याची शक्यता वाढते आणि जुनाट आजारही होऊ शकतो. 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया'ने देखील शिफारस केली आहे की तेल वारंवार गरम करणे टाळले पाहिजे आणि तुम्हाला तेल पुन्हा वापरावे लागले तरी ते तीनपेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ नये. असे केल्याने त्यात ट्रान्स फॅट तयार होऊ लागतात. ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात.

पोषण मूल्य कमी

जेव्हा तुम्ही तेल अनेक वेळा गरम करता तेव्हा त्यातील पौष्टिक मूल्ये नष्ट होतात. इतकेच नाही तर उष्णतेमुळे त्यात रासायनिक अभिक्रिया होऊन तेलातून विषारी धूर निघू लागतो. प्रत्येक वेळी तेल गरम झाल्यावर त्यातील चरबीचे रेणू तुटतात आणि ते धुराच्या बिंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अन्नामध्ये विषारी घटक मिसळू लागतात जे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.

हे वाचा - Best Time To Drink Milk: आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी या वेळी प्या दूध, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत

कोलेस्टेरॉलची पातळी वाढते

जेव्हा तेल उच्च तापमानात वारंवार गरम केले जाते तेव्हा त्यातील चरबी ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे तेल पुन्हा वापरणे टाळावे.

हे वाचा - Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

रक्तदाब

तेल वारंवार गरम केल्यामुळे अन्नातील ओलावा वातावरणातील ऑक्सिजन, उच्च तापमान हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशन सारख्या प्रक्रियेत जातो आणि त्यातून रक्तदाबावर परिणाम करणारे मुक्त फॅटी ऍसिड आणि रेडिकल निघतात. त्यामुळे एकच तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरू नका. हे टाळल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips