जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Morning Tea: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हाडांसाठीही असं ठरतं घातक; वेळीच बदला सवय

Morning Tea: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हाडांसाठीही असं ठरतं घातक; वेळीच बदला सवय

Morning Tea: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हाडांसाठीही असं ठरतं घातक; वेळीच बदला सवय

Side Effects Of Drinking Tea In Morning On Empty Stomach : अनेकांच्या जणू अंगवळणी पडलेली ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी अशी कॅफिनयुक्त पेय प्यायल्यानं त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या तर निर्माण होतातच आणि चयापचय क्रियाही खराब होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 मार्च : आपल्यापैकी अनेकांना सकाळी (Morning) उठल्याबरोबर एक-दोन कप चहा (Tea) प्यायला आवडतो. अनेकांच्या जणू अंगवळणी पडलेली ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. द हेल्थ साइटच्या मते, संशोधनात असं आढळून आलं आहे की, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी अशी कॅफिनयुक्त पेय प्यायल्यानं त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या तर निर्माण होतातच आणि चयापचय क्रियाही खराब होतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता, पोटात गॅस, उलट्या यांसारख्या समस्याही होऊ (Side Effects Of Drinking Tea In Morning On Empty Stomach ) शकतात. रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक का आहे? जेव्हा आपण रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा यकृतातून बाहेर पडणारा पित्ताचा रस पचन प्रक्रियेत मदत करत नाही, ज्यामुळे उलट्या, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात. वास्तविक, रात्रभर तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात जे चहा पिताना पोटात जातात, जे चांगले बॅक्टेरियांना त्रास देतात, ज्यामुळे चयापचय परिणाम होतो आणि पोटात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. चहा पिण्याचे तोटे आंबटपणा रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं आपली भूक संपते आणि तासन्तास खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे गॅस तयार होण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे पोटात अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. व्रण सकाळी रिकाम्या पोटी कडक चहा प्यायल्याने पोटाच्या आतील पृष्ठभागालाही नुकसान होऊ शकते. असे दीर्घकाळ केले तर अल्सर आणि अॅसिडिटीची समस्या सुरू होते. हाडे कमकुवत होणं रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय लागल्यानं पुढे काही वर्षांनी शरीरातील सांधे दुखू लागतात. त्यामुळं पुढे हाडेही कमकुवत होत जातात. डीहाइड्रेशन रात्रभर झोपून असल्यानं आपल्या शरीराला जास्त वेळ पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीरात डीहाइड्रेशन होऊ शकते. अशा परिस्थितीत शरीरात कॅफीन मिसळल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढते. हे वाचा -  पाणी पिण्याचे हे साईड इफेक्ट अनेकांना माहीत नाहीत; दिवसा इतकं पाणी पिणं पुरेसं पुरुषांमध्ये प्रोस्टेट समस्या सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेटशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. निद्रानाश जास्त चहाचे सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते आणि यामुळे चिडचिड आणि थकवा येण्याची समस्या सुरू होते. चयापचय चहामुळे शरीरातील ऍसिड आणि अल्कधर्मी संतुलनास अडथळा येतो, ज्यामुळे नियमित चयापचय विस्कळीत होतं. हे वाचा -  अशा कारणांमुळे वाढतो High BP चा धोका; या गोष्टींचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी पोषणाचा अभाव तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला तर त्यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण नीट होत नाही. दातांसाठी हानिकारक सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास शरीरात आम्लपित्त तयार होते आणि दातांच्या संपर्कात आल्याने दातांचा इनॅमल खराब होतो. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना होण्याची समस्या देखील होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात