नवी दिल्ली, 14 डिसेंबर : तुम्ही नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी रात्री जेवण केले नाही तर त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका कमी होतो. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने दिवसा अन्न खाल्ले तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही, ज्यामुळे त्याच्यामध्ये मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालं (Diabetes prevent from only daytime eating) आहे. रात्रपाळीत काम करणाऱ्यांना मधुमेहाचा धोका TimesNow च्या बातमीनुसार, संशोधनाच्या लेखकाने सांगितले की, या अभ्यासाचा उद्देश रात्री काम करणाऱ्या लोकांचे जीवन सुलभ बनवणे हा आहे. ते म्हणाले की, दुकाने, हॉटेल्स, ट्रक चालक, अग्निशमन कर्मचारी आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका जास्त असतो. कारण, हे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात आणि रात्री त्यांना खावेही लागते. रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. हे वाचा - फोटो काढण्यासाठी आला आणि खून करून गेला, कौटुंबिक वादातून मेहुण्याची हत्या नॅशनल सेंटर फॉर स्लीप डिसऑर्डर रिसर्चच्या मारिस्का ब्राउन यांनी सांगितले की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक गुंतागुंती होतात. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, रात्रपाळीच्या कामाचा परिणाम थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना दोन गटात विभागण्यात आले. दोन्ही गट रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायचे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या एका गटाला दिवसा जेवण दिले जात होते आणि रात्री जेवण दिले जात नव्हते. तर इतर गटातील लोकांना रात्री आणि दिवसा दोन्ही वेळी जेवण दिले जात होते. हे वाचा - शेतकऱ्यांसाठी खूशखबर! कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ धक्कादायक निष्कर्ष 14 दिवसांनंतर निकालाचे विश्लेषण केले असता आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले. अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक दिवसा अन्न खातात आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना रात्री जेवतात त्यांच्यामध्ये ग्लुकोजच्या पातळीत 6.4 पट वाढ झाली होती, तर फक्त दिवसा जेवलेल्या व्यक्तींमध्ये ग्लुकोजची पातळी सामान्य राहिली. मारिस्का यांनी सांगितले की, हे संशोधन अगदी कमी प्रमाणात केले गेले असले तरी त्याचे परिणाम अगदी स्पष्ट आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.