• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Tummy Fat : पोटावरील चरबी होईल गायब; रेझिस्टन्स बँडसोबत घरीच करा हे 3 व्यायाम

Tummy Fat : पोटावरील चरबी होईल गायब; रेझिस्टन्स बँडसोबत घरीच करा हे 3 व्यायाम

Get Rid Of Tummy Fat : रबरापासून बनवलेले हे बँड तुमच्या गरजेनुसार, ताकद आणि वजनानुसार उपलब्ध आहेत. ज्याचा वापर तुम्ही अनेक प्रकारच्या व्यायामासाठी करू शकता. हे बँड केवळ पोटावरील चरबीसाठीच नव्हे तर शरीराच्या विविध भागांच्या व्यायामासाठीही खूप उपयुक्त आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर त्यासाठी रेझिस्टन्स बँड आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कोरोनामुळे बहुतांश लोक अजूनही जिमला जाणं टाळत आहेत. अशा परिस्थितीत घरच्या घरी स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट कसा करायचा? असं नाही की तुम्ही जिममध्ये जात नसाल तर वेटलिफ्टिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट्स करता येणं शक्य होणार नाही. रबरापासून बनवलेले हे बँड तुमच्या गरजेनुसार, ताकद आणि वजनानुसार उपलब्ध आहेत. ज्याचा वापर तुम्ही अनेक प्रकारच्या व्यायामासाठी करू शकता. हे बँड केवळ पोटावरील चरबीसाठीच नव्हे तर शरीराच्या विविध भागांच्या व्यायामासाठीही खूप उपयुक्त आहेत. तुम्हाला पायांची चरबी कमी करायची असेल तर त्यासाठीदेखील उपयोग करता (Get Rid Of Tummy Fat) येईल. हे तुमच्या शरीराला टोन करण्यासोबतच फॅट बर्न करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. इथे आम्ही असे काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकाल. त्यासाठी तुम्हाला विशेष काहीही करण्याची गरज नाही, फक्त या बँडची मदत घ्या आणि व्यायाम सुरू करा. फक्त तुमच्या रोजच्या व्यायामात त्यांचा समावेश करा किंवा ऑनलाइन व्हिडिओंची मदत घ्या. या गोष्टींची आवश्यकता असेल रेझिस्टन्स बँडसह व्यायाम करण्यासाठी तुम्हाला विशेष कशाचीही गरज नाही, फक्त योगा मॅट आणि हा बँड पुरेसा आहे. बँड निवडण्यापूर्वी, ते खूप हलके आणि कमकुवत नाहीत याची खात्री करा. हे वाचा - Rajkumar Rao-Patralekhaa च्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री! सेलिब्रेशनचा फर्स्ट Photo आला समोर डंकी किक डंकी किक हा एक सोपा व्यायाम आहे, परंतु तुम्ही बँडच्या मदतीने ते कठीण करू शकता. यामुळे तुमच्या ग्लुट्स आणि हॅमस्ट्रिंग्सवर ताण येतो. लेग लिफ्ट लेग लिफ्टचे व्यायाम तुमच्या मांडीच्या बाहेरील भागावर काम करतील, परंतु या बँडच्या मदतीने तो संपूर्ण शरीराचा व्यायाम बनतो. हे वाचा - VIDEO : चिमुकल्याला मारूतीपासून टाटापर्यंत सर्व कंपनीच्या गाड्यांची माहिती, उत्तरं ऐकून अँकर दिपाली राणाही अवाक ब्रिझ पोझ ब्रिज हा तुमच्या बुटीला म्हणजेच नितंबांना टोन करण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. हे संपूर्ण पायांऐवजी ग्लूट स्नायूंना टोन करतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: