मुंबई,30 जानेवारी : कुळीथ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. शरीराला प्रथिनं मिळण्यासाठी अनेक लोक तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि वाटाणे यासारख्या डाळींचं सेवन करतात. पण तुम्हाला कुळिथाच्या डाळीचे फायदे माहीत आहेत का? ही डाळ फारशी प्रसिद्ध नसल्यामुळं बहुतेक लोकांना कुळिथाच्या डाळीचे फायदे माहीत नाहीत. कुळिथाची डाळ ही केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर, अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीदेखील (kulit dal Benefits) उपयुक्त आहे. कुळिथाच्या डाळीचं पीक मुख्यतः दक्षिण भारतात घेतलं जातं. रसम आणि सांबरसारख्या दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कुळिथाची डाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. गडद तपकिरी रंगाची असल्यानं ही डाळ थोडीशी मसूराच्या डाळीसारखी दिसते. Netmeds वेबसाइटनुसार, याचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे. चला, आज या डाळीचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ. मधुमेहावर प्रभावी डायबिटीज किंवा मधुमेह हा बहुतांशी वृद्धांमध्ये दिसून येतो. मधुमेहामुळं आपल्या आहारात देखील बरेच बदल करावे लागतात. पण कुळिथाच्या डाळीमध्ये (Horse gram) पौष्टिक गुणधर्मांसह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचाही गुण आहे. निरोगी हृदयासाठी कुळिथाची डाळ कुळिथाच्या डाळीत भरपूर पोषक तत्त्वं असतात. शिवाय, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ही डाळ आहारात समाविष्ट करणं फायदेशीर आहे. कुळिथाची डाळ नियमित खाल्ल्यानं हृदयविकार टाळता येतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कुळिथाची डाळ कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते कुलथी डाळ शरीरातील LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून HDL म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. त्यामुळंच कुळिथाच्या डाळीचा आहारात नक्की समावेश करा. हे वाचा - Skin Care: चेहऱ्यावरील स्ट्रेच मार्क्स, डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय आहे स्वयंपाक घरातील ही डाळ हंगामी आजारांपासून आराम कुळिथ नेहमीच्या आहारात असेल तर ऋतू बदलाबरोबर होणाऱ्या सर्दी-पडसं, खोकला, ताप यांसारख्या मौसमी आजारांच्या समस्या कमी होतात. कुळिथामध्ये उष्णतेचा गुणधर्म असल्यानं याच्यामुळं हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवलं जातं. बद्धकोष्ठता दूर होईल कुळिथाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर आढळतं. यामुळंच या डाळीचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात. हे वाचा - वयाच्या तिशीनंतर या डाळी खाणं आहे आवश्यक; जाणून घ्या आरोग्याला मिळणारे फायदे लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त जर तुम्ही लठ्ठपणानं त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कुळिथाची डाळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या डाळीचे आरोग्याला होणारे फायदे भरपूर असल्यानं याचा नेहमीच्या आहारात समावेश करणं फायदेशीर ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.