मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

warning sign of kidney problem: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो, त्यामुळे आपली किडनी कमकुवत होत आहे. म्हणूनच किडनीची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला किडनीमध्ये समस्या कधी येतात हे समजून घेणे गरजेचे आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 25 डिसेंबर : किडनीशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. आपली किडनी पूर्णपणे काम करणे बंद झाली तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही. त्यामुळेच निसर्गाने आपल्याला दोन किडनी दिल्या आहेत. एक किडनी निकामी झाली तर दुसरी किडनी संपूर्ण काम करू शकते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अनेक प्रकारचे विषारी घटक तयार होतात. हे विषारी घटक शरीरातून काढून टाकण्याचे काम किडनी करते. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करते आणि मूत्राद्वारे (warning sign of kidney problem) काढून टाकते. आज आपली जीवनशैली ज्या प्रकारे बदलत आहे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो, त्यामुळे आपली किडनी कमकुवत होत आहे. म्हणूनच किडनीची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला किडनीमध्ये समस्या कधी येतात हे समजून घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया काही लक्षणांविषयी ज्याद्वारे आपल्याला किडनीमध्ये समस्या आहे की, नाही ते समजते. नेहमी थकवा वेबएमडीच्या बातमीनुसार, जर तुम्हाला नेहमी थकवा येत असेल तर ते किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. किडनीला विषारी घटक बाहेर काढण्यात अडचण येत असेल तर समजून घ्या की हे विष तुमच्या पेशींमध्ये जमा होऊ लागले आहेत, त्यामुळे थकवा खूप येऊ लागतो. रक्तातील टॉक्सिनचे प्रमाण वाढल्यामुळे स्नायू आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही, त्यामुळे नेहमी थकवा जाणवण्याचा त्रास होतो. झोपेची कमतरता किडनी निकामी होण्याचा थेट संबंध कमी झोपेशी असतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. स्लीप एपनियामुळे किडनी निकामी होऊ शकते. खरं तर, शरीराच्या इतर आवश्यक अवयवांना वाचवण्यामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त अचानक दबाव येऊ शकतो, ज्यामुळे किडनी निकामी होऊ शकते. हे वाचा - Methi-Ajwain Water: मेथी-ओव्याचे पाणी हिवाळ्यात पिण्याचे इतके आहेत फायदे; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत त्वचेला खाज सुटणे त्वचेवर वारंवार खाज येत असेल तर ते मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. जेव्हा किडनीमध्ये विषारी पदार्थ जास्त प्रमाणात असतात, तेव्हा ते त्वचेखाली दबले जाऊ लागतात, ज्यामुळे त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा आणि दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते. चेहरा सूजणे किडनी नीट काम करत नसेल, तेव्हा त्यातील सोडियमचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे हात, पाय, घोटे, चेहरा इत्यादींवर शरीरातील द्रव साचू लागतात. त्यामुळे चेहरा सुजलेला दिसतो. हे वाचा - थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या स्नायूंमध्ये क्रॅम्पिंग पाय आणि पिंडऱ्यांमध्ये पेटके येणे (क्रँम्प) हे खराब मूत्रपिंडाचे लक्षण असू शकते. हे सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्समधील असंतुलनामुळे होते. हे सर्व किडनी विकाराशी संबंधित आहेत. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Kidney sell, Lifestyle

    पुढील बातम्या