मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सेक्स लाईफसाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

सेक्स लाईफसाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

food to eat before sex: धकाधकीचे हे जीवन सेक्स लाईफवरही (sex life) परिणाम करत आहे. यामुळे जोडीदारासोबत सेक्स करताना उत्साह नसणे, त्यातून सॅटिसफिकेशन न मिळणे, अशा गोष्टी होत राहतात.

food to eat before sex: धकाधकीचे हे जीवन सेक्स लाईफवरही (sex life) परिणाम करत आहे. यामुळे जोडीदारासोबत सेक्स करताना उत्साह नसणे, त्यातून सॅटिसफिकेशन न मिळणे, अशा गोष्टी होत राहतात.

food to eat before sex: धकाधकीचे हे जीवन सेक्स लाईफवरही (sex life) परिणाम करत आहे. यामुळे जोडीदारासोबत सेक्स करताना उत्साह नसणे, त्यातून सॅटिसफिकेशन न मिळणे, अशा गोष्टी होत राहतात.

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक त्यांच्या कामात खूप व्यग्र होऊन गेले आहेत. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवायला देखील अनेकांकडे वेळ नाही. धकाधकीचे हे जीवन सेक्स लाईफवरही (sex life) परिणाम करत आहे. यामुळे जोडीदारासोबत सेक्स करताना उत्साह नसणे, त्यातून सॅटिसफिकेशन न मिळणे, अशा गोष्टी होत राहतात. मग नात्यांमध्ये आपोआपचा दुरावा येवू लागतो, वाद होऊ लागतात. यासाठी आज आपण चांगल्या सेक्स लाईफसाठी सोपे उपाय (food to eat before sex) जाणून घेऊया.

तुम्हीही या परिस्थितीतून जात असाल तर चांगल्या कामजीवनासाठी काही गोष्टी आहारात घेतल्याने त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. चांगल्या लैंगिक जीवनासाठी खालील गोष्टींचा आहारात समावेश केल्याने मूड सुधारतो. यासोबतच स्टॅमिनाही वाढेल आणि तुम्ही मनाने तयार व्हाल. जाणून घेऊया शारीरिक संबंधापूर्वी कोणत्या गोष्टी खाव्यात.

लैंगिक संबंधापूर्वी खाण्याच्या गोष्टी

डाळिंब

वेबएमडीच्या बातमीनुसार, डाळिंब हे नेहमीच प्रजनन क्षमता आणि लैंगिक शक्ती वाढवणारे फळ मानले जाते. याशिवाय ते चवीलाही गोड आहे. सेक्सपूर्वी डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने मूड सुधारतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. शरीरातील रक्त परिसंचलण वाढवते आणि सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटला रोमान्सिंग चॉकलेट असेही म्हणतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन हार्मोनची पातळी लगेच वाढते. सेरोटोनिन हार्मोन आनंद आणतो, ज्यामुळे सेक्स मूड तयार होतो. यामुळे सेक्स ड्राइव्हही सुधारू शकते.

पालक

पालक नक्की खा. पालक अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असून सेक्स ड्राईव्ह वाढवण्यातही तो महत्त्वाचा आहे. पालकमध्ये मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे मिनरल्स असतात जे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतात.

हे वाचा - Methi-Ajwain Water: मेथी-ओव्याचे पाणी हिवाळ्यात पिण्याचे इतके आहेत फायदे; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

टरबूज

टरबूजमध्ये अनेक प्रकारचे अमिनो अॅसिड आढळतात. यापैकी, सिट्रुलीन आणि आर्जिनिन प्रमुख आहेत. हे दोन्ही अमिनो अॅसिड रक्तवाहिन्यांना आराम देतात. या अमिनो अॅसिडमुळे तुमच्या प्रायव्हेट पार्टकडे रक्ताचा प्रवाह वाढतो.

हे वाचा - थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या

अ‌ॅवोकॅडो (avocado)

अ‌ॅवोकॅडोला सेक्स बूस्टर असेही म्हणतात. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात हेल्दी फॅट आणि फायबर आढळतात. जे ऊर्जा आणि स्टॅमिना बूस्टर म्हणून काम करतात. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 असते, त्यामुळे थकवा कमी होतो. अ‌ॅवोकॅडो सामान्यतः महिलांना मूड बनवण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Sexual health, Sexual wellness