मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Swollen feet : थंडीच्या दिवसात तुमचेही पाय सुजतात का? हे घरगुती उपाय करून पाहा परिणाम

Swollen feet : थंडीच्या दिवसात तुमचेही पाय सुजतात का? हे घरगुती उपाय करून पाहा परिणाम

Home remedies for swollen feet: पाय सुजण्याची अनेक कारणं असू शकतात. पण थंडीमुळे पाय सूजत असतील तर हे उपाय फायदेशीर ठरतील.

Home remedies for swollen feet: पाय सुजण्याची अनेक कारणं असू शकतात. पण थंडीमुळे पाय सूजत असतील तर हे उपाय फायदेशीर ठरतील.

Home remedies for swollen feet: पाय सुजण्याची अनेक कारणं असू शकतात. पण थंडीमुळे पाय सूजत असतील तर हे उपाय फायदेशीर ठरतील.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 डिसेंबर : हिवाळ्यात (Winter health tips) काही जणांचे पाय सुजतात. यामुळं खूप वेदना होतात. पाय सुजण्याची (Swollen feet) अनेक कारणं असू शकतात. सूज, दुखापत, गर्भधारणा, प्रीक्लेम्पसिया, जीवनशैलीशी संबंधित बाबी, औषधांचे दुष्परिणाम, मद्यपान, संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या आदींमुळं हे होऊ शकतं. दिवसभर काम करून थकल्यानंतरही पाय सुजतात. मात्र, यापैकी बहुतेक लोकांना वेदनारहित सूज (Home remedies for swollen feet) असते.

जरी बहुतेक प्रकरणांमध्ये पायांची सूज ही एक मोठी आरोग्य समस्या नसली तरी, जर ती वारंवार त्रास देत असेल आणि त्यावर उपचार न केले गेले नाहीत तर समस्या उद्भवू शकतात. या सूजेपासून सुटका मिळवण्यासाठी घरच्या घरी काही चांगले उपाय करावे लागतील. येथे काही टिप्स आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सुजलेल्या पाय पूर्ववत बरे करू शकाल.

सूज दूर करण्यासाठी घरगुती उपाय

कॉम्प्रेशन सॉक्स (Compression socks)

TOI च्या बातमीनुसार, जर तुमच्या पायात सतत सूज येत असेल, तर तुम्ही कॉम्प्रेशन सॉक्स वापरावे. यामुळे, ऊतींवर दाब पडतो आणि शरीरातील द्रवपदार्थ पायाजवळ जमा होऊ शकत नाही.

खडे मीठ/सैंधव

सुजलेल्या पायांपासून मुक्तता मिळवण्यासाठी खडे मीठ/सैंधव हा एक सामान्य घरगुती उपाय आहे. खूप पूर्वीच्या काळापासून पायांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पाण्याच्या टबमध्ये खडे मीठ टाकून त्यात 15-10 मिनिटं पाय ठेवल्यानं सूज येण्याची समस्या दूर होते आणि दुखण्यापासूनही आराम मिळतो.

हे वाचा - राज्यात Omicron रुग्णांची संख्या 50 पार, पुण्यात 5 वर्षांच्या मुलालाही लागण!

बेकिंग सोडा आणि तांदळाचं पाणी

बेकिंग सोडा आणि तांदळाचं पाणी हे दोन्ही पायांची सूज कमी करतात. हे दोन्ही एकत्र करून 15-20 मिनिटं पाय त्यात बुडवून ठेवल्यास सूज लवकर दूर होते.

दालचिनी आणि लिंबू

दालचिनी आणि लिंबू पायांची सूज लवकर कमी करू शकतात. यासाठी दालचिनी, लिंबू, दूध आणि ऑलिव्ह ऑईलची पेस्ट बनवून रात्री पायांवर लावून ठेवा. सकाळी पाय स्वच्छ करा. या पेस्टमुळं गर्भवती महिलांना खूप आराम मिळेल.

हे वाचा - Omicron update: नाका-तोंडातून कोरोना करतो शरीरात प्रवेश; आयुष मंत्रालयाने सांगितले हे 5 उपाय

लिंबाचा वापर

लिंबूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स पायांची सूज लवकर कमी करू शकतात. यासाठी पायावर लिंबाचा रस (Lemon Juice) चोळा. यामुळं सूज येण्याच्या समस्येपासून लवकरच आराम मिळतो.

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter