नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : धावल्यानंतर आणि खेळल्यानंतर अनेकांचे पाय दुखतात. मात्र, पाय विनाकारण दुखत असतील तर, त्याची अनेक कारणं असू शकतात. पायदुखीची (Leg Pain) इतर कारणं म्हणजे पोषणाचा अभाव, चुकीच्या मापाचे किंवा योग्य फिटिंग नसलेले शूज, संधिवात, लठ्ठपणा आणि वृद्धत्व. काही घरगुती उपायांसह जीवनशैलीत काही बदल केल्यास पायदुखीपासून आराम मिळू (Home Remedies For Leg Pain) शकतो.
गरम पाणी
जेव्हा पायाच्या शिरांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही, तेव्हा अनेकदा पाय दुखतात. यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. यामुळं रक्तप्रवाह सुधारतो आणि पायाला आराम मिळतो. यासाठी तुम्ही गरम पाण्याच्या पिशव्या किंवा टॉवेल गरम करून त्याचा वापर करू शकता. याशिवाय, गरम पाण्यानं भरलेल्या बादलीत बसून त्यात तुमचे पाय बुडवू शकता.
एप्सम सॉल्ट
हल्ली तणाव कमी करण्यासोबतच वेदना कमी करण्यासाठी एप्सम सॉल्टचाही वापर केला जातो. हे कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल. कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट आणि सोडा मिसळावा आणि त्यात पाय टाकून बसावे. यामुळं स्नायूंना आराम मिळेल आणि पाय दुखण्याचं कमी होईल.
हे वाचा - Women Health : महिलांमध्ये अशी असतात हृयदविकाराची लक्षणं; त्याकडं दुर्लक्ष करणं पडेल महागात
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं स्नायूंमध्ये वेदना होतात. शिवाय हाडंही कमकुवत होतात. व्हिटॅमिन डीसाठी सकाळ-संध्याकाळ सूर्यप्रकाश घेणं चांगलं असतं. याशिवाय, ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी जास्त असतं, त्यांचा आपल्या आहारात समावेश करावा. त्यात अंडी, सॅल्मन फिश, ओटमील, मशरूम आदींमध्ये व्हिटॅमिन डी असतं.
हे वाचा - 35 हजार रुपये कमावणारा IT इंजिनिअर बनला शेतकरी, महिनाकाठी कमावतोय लाखो रुपये
पेपरमिंट चहा
तुमच्याकडे पुदिना उपलब्ध असेल तर, काही पानं पाण्यात टाकून ते पाणी गरम करून गाळून प्या. याशिवाय आजकाल बाजारात पेपरमिंट टी बॅग्ज मिळतात. त्या घेऊन गरम पाण्यात टाका आणि मग त्या पाण्यात पाय बुडवा. दुखण्यात आराम मिळेल.
(या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Healthy bones