मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळ्यात यामुळे शरीराला Vitamin D कमी पडतं, जाणून घ्या कोणाला असतो जास्त धोका

हिवाळ्यात यामुळे शरीराला Vitamin D कमी पडतं, जाणून घ्या कोणाला असतो जास्त धोका

Vitamin d deficiency symptoms:  व्हिटॅमिन डी उच्च रक्तदाब, कर्करोग (Cancer) आणि अनेक ऑटोइम्यून रोगांच्या जोखमीपासून देखील शरीराचे संरक्षण करते. व्हिटॅमिन डीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्याची क्षमता वाढते

Vitamin d deficiency symptoms: व्हिटॅमिन डी उच्च रक्तदाब, कर्करोग (Cancer) आणि अनेक ऑटोइम्यून रोगांच्या जोखमीपासून देखील शरीराचे संरक्षण करते. व्हिटॅमिन डीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्याची क्षमता वाढते

Vitamin d deficiency symptoms: व्हिटॅमिन डी उच्च रक्तदाब, कर्करोग (Cancer) आणि अनेक ऑटोइम्यून रोगांच्या जोखमीपासून देखील शरीराचे संरक्षण करते. व्हिटॅमिन डीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्याची क्षमता वाढते

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : व्हिटॅमिन डी (Vitamin D) हे शरीरासाठी सर्वात महत्वाच्या जीवनसत्त्वांपैकी एक आहे. व्हिटॅमिन डी रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरस (Phosphorous) संतुलित राखते. म्हणजेच त्यामुळे रक्तातील कॅल्शियम (Calcium) वाढत नाही किंवा कमीही होत नाही. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेते, त्यानंतर कॅल्शियमचा हाडांच्या (Bone) तंदुरुस्तीसाठी उपयोग होतो. व्हिटॅमिन डी रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण देखील नियंत्रित करते. व्हिटॅमिन डी शरीरातील ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) प्रतिबंधित करते.

अनेक अभ्यासांमध्ये असेही आढळून आले आहे की, व्हिटॅमिन डी उच्च रक्तदाब, कर्करोग (Cancer) आणि अनेक ऑटोइम्यून रोगांच्या जोखमीपासून देखील शरीराचे संरक्षण करते. व्हिटॅमिन डीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्याची क्षमता (Vitamin d deficiency symptoms) विकसित होते.

हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता का जास्त असते

इतके गुणधर्म असूनही हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, बहुतेक व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळते. त्वचा या प्रकाशाचे संश्लेषण करते आणि शरीरात काम करण्यासाठी योग्य बनवते. व्हिटॅमिन डी अन्नातून फारच कमी मिळू शकते. विशिष्ट प्रकारचे मासे, माशांचे यकृत तेल, अंड्यातील पिवळा बलक आणि काही धान्यांपासून ते काही प्रमाणात मिळू शकते. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो आणि सामान्यत: लोकांना व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांबद्दल कमी माहिती असते. यामुळेच हिवाळ्यात बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.

या लोकांना जास्त धोका

बहुतेक वेळ घरी घालवणे

हिवाळ्यात सूर्यप्रकाश मुळातच कमी असतो आणि सूर्यप्रकाश आल्यावर बहुतेक लोक बाहेर पडत नाहीत. सूर्यप्रकाशात अजिबात न जाण्यामुळे व्हिटॅमिन डीचा गंभीर धोका उद्भवू शकतो.

हे वाचा - थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या

काळी त्वचा

ज्या लोकांची त्वचा काळी आहे, त्यांना देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका असतो कारण त्यांच्या त्वचेतील पिंगमेंट मेलानिन कमी होते, ज्यामुळे त्वचा सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी संश्लेषित करण्यास असमर्थ होते. वृद्धांची त्वचा देखील काळी पडते, अशावेळी त्यांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता देखील असू शकते.

लठ्ठपणा

लठ्ठपणामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता देखील उद्भवू शकते. ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त असतो, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते.

हे वाचा - Rules Changing in January 2022: सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे बदल 1 जानेवारीपासून होणार लागू, वाचा सविस्तर

शरीरात व्हिटॅमिन डी किती असावे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी चाचण्या कराव्या लागतात. जर व्हिटॅमिन डी 20 नॅनोग्राम आणि 50 नॅनोग्राम प्रति मिलीलीटर रक्ताच्या दरम्यान असेल, तर ही योग्य पातळी आहे. परंतु, जर एखाद्याच्या रक्तात प्रति मिलीलीटर 12 नॅनोग्रामपेक्षा कमी व्हिटॅमिन डी असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याला त्वरित पूरक आहाराची आवश्यकता आहे.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Vitamin D