मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Stomach Pain: थंडीच्या दिवसात तुम्हीही पोटदुखीनं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

Stomach Pain: थंडीच्या दिवसात तुम्हीही पोटदुखीनं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

Home remedies for Stomach Pain in Winter: थंडीमुळे आपल्या अनेक सवयी बदलतात आणि रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ लागते. त्यामुळे शरीरात छोटे-छोटे आजार वाढू लागतात. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळेच हिवाळ्यात अनेकदा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू लागतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : हिवाळ्यात पोटदुखी (Stomach Pain) ही एक सामान्य समस्या आहे. घसरलेल्या तापमानाचा परिणाम त्वचेवर आणि पोटावर अधिक होतो. थंडीमुळे आपल्या अनेक सवयी बदलतात आणि रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ लागते. त्यामुळे शरीरात छोटे-छोटे आजार वाढू लागतात. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळेच हिवाळ्यात अनेकदा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू लागतात. पोटात अचानक दुखू लागल्यावर काय करावे, हेच समजत नाही. मात्र, यासाठी फारशी काळजी करण्याची गरज नाही. आपल्या घरातच अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून पोटदुखीच्या समस्येवर सहज (Home remedies for Stomach Pain in Winter) उपचार करता येतात.

हिवाळ्यात पोट का खराब होते

ओन्ली माय हेल्थच्या बातमीनुसार, हिवाळ्यात पोटदुखीची समस्या सामान्य आहे. तापमानात घट झाल्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यासाठी अतिरिक्त कॅलरीज आवश्यक आहेत. त्यामुळे पचनसंस्था खूप सक्रिय होऊन भूक जास्त लागते. यामुळेच हिवाळ्यात लोक जास्त अन्न खाण्यास सुरुवात करतात आणि त्याचा दबाव पचनसंस्थेवर पडतो. मग अनेक कारणांमुळे अचानक पोटात दुखू लागते.

हिवाळ्यात पोटदुखीवर घरगुती उपाय

काळी मिरी

काळी मिरी पोटासाठी खूप चांगली मानली जाते. यासाठी सुंठ, काळे मीठ आणि हिंगामध्ये काळी मिरी पावडर मिसळा आणि ते कोमट पाण्यात घालून प्या. पोटाशी संबंधित अनेक समस्या लवकर दूर होतील.

हे वाचा - तीव्र वेदना सहन करत पायाच्या तळव्यावर काढला टॅटू, फोटोसाठी येतेय लाखोंची ऑफर; पाहा VIDEO

मेथी

पोटदुखीच्या उपचारासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहेत. कोमट पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून प्या. पोटातील गॅसच्या समस्येपासून लगेच आराम मिळेल आणि वेदनाही दूर होतील.

मीठाचे पाणी

मीठ-पाणी ही अगदी साधी रेसिपी आहे. याचा अनेक व्याधींवर इलाज आहे. अचानक पोटात दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ घालून प्यावे. तुम्हाला लवकरच पोट दुखण्यापासून आराम मिळेल.

हे वाचा - White Honey: तुम्ही कधी पांढरा मध खाल्लाय का? त्याचे आरोग्यासाठी इतके सारे आहेत फायदे

दालचिनी

दालचिनी पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. जर तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल तर जेवणानंतर दालचिनी पावडर मध मिसळून खा. पोटदुखीच्या समस्येपासून त्वरित आराम मिळेल.

पोटात होणाऱ्या सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी जिरे, धणे, बडीशेप, ओवा आणि मेथी रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी सेवन करा, तुम्हाला चांगला फायदा होईल.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे, न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)

First published:

Tags: Stomach, Stomach pain