मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमच्याही घरात धडपडी, चंचल मुलं आहेत? त्यांनाही धनुर्वाताचे इंजेक्शन देणं यासाठी आहे गरजेचं

तुमच्याही घरात धडपडी, चंचल मुलं आहेत? त्यांनाही धनुर्वाताचे इंजेक्शन देणं यासाठी आहे गरजेचं

Everything You Need To Know About Tetanus : केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रौढांनाही टिटॅनसच्या विरोधातील लस घेणं गरजेचं आहे. मेयोक्लिनिकच्या मते, टिटॅनस हा खरं तर मज्जासंस्थेचा एक गंभीर आजार आहे, जो विष निर्माण करणाऱ्या जीवाणूंमुळे होतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर : लहान मुले चंचल असतात आणि त्यांना दुखापत होणे देखील सामान्य बाब आहे. परंतु खेळामध्ये किंवा धावताना त्यांना नखे ​किंवा काच इत्यादी कापून रक्त येत असेल तर ते हलक्यात घेऊ नका, त्यांना 24 तासांच्या आत धनुर्वाताचे इंजेक्शन किंवा औषध देणं खूप महत्त्वाचे आहे. केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रौढांनाही टिटॅनसच्या विरोधातील लस घेणं गरजेचं आहे. मेयोक्लिनिकच्या मते, टिटॅनस हा खरं तर मज्जासंस्थेचा एक गंभीर आजार आहे, जो विष निर्माण करणाऱ्या जीवाणूंमुळे होतो. टिटॅनसमुळे स्नायू जलद आकुंचन पावतात. विशेषतः जबडा आणि मानेच्या स्नायूंमध्ये. त्याला लॉकजॉ असेही म्हणतात. टिटॅनस हा एक गंभीर जीवघेणा आजार आहे, ज्यावर आजपर्यंत कोणताही इलाज नाही. त्यामुळे धनुर्वाताचे इंजेक्शन योग्य वेळी घेणे (Everything You Need To Know About Tetanus) महत्त्वाचे आहे.

टिटॅनस म्हणजे काय

हा एक गंभीर रोग आहे जो मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या आत बॅक्टेरियामुळे होतो. याचा संसर्ग पसरत नसला तरी प्राणघातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत 24 तासांच्या आत धनुर्वाताची लस घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टिटॅनसपासून मुलाचे संरक्षण करण्याचे उपाय

MayoClinic च्या मते, 2, 4 आणि 6 महिने वयाच्या बाळाला पहिले 3 शॉट्स दिले जातात. चौथा शॉट 12 महिने ते 18 महिन्यांच्या वयात दिला जातो. यानंतर, 4 ते 6 वर्षांच्या दरम्यान, त्याला पुढील शॉट दिला जातो. नियमित तपासणी दरम्यान एक Tdap शॉट देखील दिला जातो. मुलाच्या जन्मापूर्वी, म्हणजे, गर्भवती महिलांना 27 ते 36 आठवड्यांत टिटॅनसची गोळी देखील मिळते, डॉक्टर शिफारस करतात जेणेकरून न जन्माला येणाऱ्या मुलाला अतिरिक्त संरक्षण मिळू शकते.

हे वाचा - शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट

टिटॅनसची लक्षणे

- पोटाचे आणि कंबरेचे स्नायू कडक होणे.

- चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये आकुंचन.

- मुलांची जलद नाडी.

- ताप येणे.

- जास्त घाम येणे.

- जखमेच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये खूप वेदना होतात.

- सूज येणे.

टिटॅनस कसे टाळावे

प्रथम जखमेची जागा व्यवस्थित स्वच्छ करा आणि जवळच्या कोणत्याही क्लिनिकमध्ये टिटॅनस अँटी टॉक्सिन इंजेक्शन घ्या.

हे वाचा - Hair Problems: केसांच्या अनेक समस्यांवर तांदळाचे पीठ आहे गुणकारी, या 3 पद्धतींनी करा उपयोग

टिटॅनसचे इंजेक्शन न मिळाल्याने होणारे नुकसान

टिटॅनसचे इंजेक्शन न दिल्यास दहा दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. हा कालावधी 3 ते 21 दिवसांचा आहे. अशा वेळी व्होकल कार्डमध्ये दोष, हाड फ्रॅक्चर, श्वास घेण्यास त्रास, उच्च रक्तदाब, फुफ्फुसात संसर्ग, हृदयाचे ठोके असामान्य होणे. इत्यादी बाबी दिसून येतात.

( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips