नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : मायक्रोवेव्हचा वापर आजकाल सर्रास झाला आहे. स्वयंपाकाचे शौकीन स्वादिष्ट डिश बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतात. व्यग्र दिनचर्येमुळे काही लोक अन्न (Food) गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हला (Microwave Oven) प्राधान्य देतात. मायक्रोवेव्हमुळे पदार्थांची चवही चांगली राहते. मायक्रोवेव्हचे फायदे अनेक असले तरी आजही अनेकांना मायक्रोवेव्हचे दुष्परिणाम (When Not to Use Microwave) माहीत नाहीत.
मायक्रोवेव्ह तुमचे काम सोपे करत असले तरी दुसरीकडे, मायक्रोवेव्हमध्ये काही गोष्टी गरम केल्याने आपल्या शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आपण अशा पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत.
मायक्रोवेव्हमध्ये चिकन गरम करणे टाळा
चिकन किंवा चिकनची कोणतीही डिश मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने त्यातील प्रोटीन्ससह अनेक पोषक घटक नष्ट होतात. यासोबतच तुम्हाला पोटदुखी आणि जुलाब देखील होऊ शकतात.
अंडी गरम करू नका
उकडलेले अंडे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काही लोक मायक्रोवेव्हमध्ये अंडी गरम करू खातात. पण, असे केल्याने अंड्यातील पोषक तत्व पूर्णपणे नष्ट होतात. तसेच मायक्रोवेव्हचे तापमान जास्त असल्याने अंडी फुटण्याची भीती असते.
हे वाचा -
Tandoori Roti वर ताव मारताय तर सावध व्हा! हे आहेत भयंकर Side Effects
तेल अजिबात गरम करू नका
मायक्रोवेव्हमध्ये तेल गरम करणे खूप हानिकारक आहे. ओव्हनमध्ये तेल गरम केल्याने त्यातील फॅट तर निघून जातेच, पण ते खराब फॅटमध्येही बदलते. ज्यामुळे तुमच्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते.
मशरूम गरम करणे टाळा
साधारणपणे भाज्यांना पोषक तत्वांचा खजिना म्हटले जाते. मशरूमचे नाव देखील यापैकी एक आहे. मशरूम डिश केवळ चवदारच नाही तर खूप आरोग्यदायी देखील आहे. पण मायक्रोवेव्हमध्ये मशरूम गरम केल्याने त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि तुमचे पचन बिघडण्याची शक्यताही वाढते.
हे वाचा -
Onion Hacks: किचनपासून कारपर्यंत.. कांद्याचे इतके फायदे यापूर्वी तुम्हाला कोणी सांगितले नसतील
भात गरम करणे
अन्न गरम करताना गडबडीत बर्याच वेळा आपण मायक्रोवेव्हमध्ये सर्व पदार्थांसह भात गरम करण्यासाठी ठेवतो. मात्र, ओव्हनमध्ये भात गरम केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. वास्तविक, मायक्रोवेव्हच्या उच्च तापमानामुळे भातातील बॅसिलस नावाचे जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे डायरिया आणि पचनसंस्थेसारख्या समस्या उद्भवू शकतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.