मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Walking after meal : जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहासाठीही आहे उपयोगी; वाचा सर्व फायदे

Walking after meal : जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहासाठीही आहे उपयोगी; वाचा सर्व फायदे

Walking after meal : जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न पोटात गेल्यावर खूप लवकर आतड्यात पोहोचते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. याशिवाय चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Walking after meal : जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न पोटात गेल्यावर खूप लवकर आतड्यात पोहोचते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. याशिवाय चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Walking after meal : जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न पोटात गेल्यावर खूप लवकर आतड्यात पोहोचते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. याशिवाय चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. TOI च्या बातमीनुसार, जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा पोटात गेल्यावर अन्नाचे तुकडे होतात. यानंतर शरीर या अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेते. अन्नाच्या महत्त्वाच्या भागाचे पचन लहान आतड्यात होते. संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न पोटात गेल्यावर खूप लवकर आतड्यात पोहोचते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. याशिवाय चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. चालणे हे कार्डिओ व्यायामासारखेच आहे. यामुळे संपूर्ण शरीरात हालचाल होते जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Walking after meal) असते.

चालल्याने पचनक्रिया गतिमान होते

जेवणानंतर चालण्याने पचनक्रिया गतिमान होते, अन्न जितक्या वेगाने पोटातून लहान आतड्यात जाते, तितक्या लवकर तुम्हाला ब्लोटिंग, गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या सामान्य समस्यांपासून आराम मिळेल. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवणानंतर नियमित 30 मिनिटे चालण्याने आतड्यांचे कार्य सुधारते, तसेच बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

हे वाचा - राम गोपाल वर्मांच्या ‘Ladaki’मध्ये अ‍ॅक्शनसोबत बोल्डनेसचा तडका, मराठमोळ्या अभिनेत्रीचे जबरदस्त स्टंट्स

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर

संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर चालणे केवळ पचन सुधारत नाही तर टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांना देखील फायदा होतो. न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातील संशोधकांच्या मते, जेवणानंतर ग्लुकोजची पातळी वाढते. या ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीला नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन स्रावित केले जाते. परंतु, टाइप-2 शुगर असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. म्हणून, जेव्हा तो अन्न खाल्ल्यानंतर चालतो तेव्हा बहुतेक ग्लुकोज शरीरात उर्जेच्या स्वरूपात खर्च होते.

हे वाचा - Mumbai Blast, अंडरवर्ल्ड आणि हसीना पारकर; देवेंद्र फडणवीसांनी फोडला ‘नवा’बॉम्ब

त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. संशोधनात असेही म्हटले आहे की, जे लोक जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खातात त्यांनी जेवल्यानंतर नक्कीच चालावे, खाल्ल्यानंतर चालण्याने शरीरातील क्रियाकलापांसाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला जातो. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास त्यामुळं मदत होते.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Sugar, Walk