जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शरीरातील अतिरिक्त चरबीचा विचार करण्याच्या क्षमतेवरही होतो परिणाम - Study

शरीरातील अतिरिक्त चरबीचा विचार करण्याच्या क्षमतेवरही होतो परिणाम - Study

शरीरातील अतिरिक्त चरबीचा विचार करण्याच्या क्षमतेवरही होतो परिणाम - Study

Body fat is a risk for cognitive function : शरीरात चरबी जास्त असल्यास विचार आणि स्मरणशक्तीशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतात. ही समस्या विशेषतः प्रौढांमध्ये उद्भवते, त्यांना सांगितलेली माहिती पटकन समजण्यात अडचण येवू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 मार्च : शरीरातील अतिरिक्त फॅट (चरबी) हे अनेक आजारांचे कारण ठरते. वाढलेली चरबी आपल्या मेंदूसाठीही घातक बनू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? एका नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, शरीरात चरबी जास्त असल्यास विचार आणि स्मरणशक्तीशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतात. ही समस्या विशेषतः प्रौढांमध्ये उद्भवते, त्यांना सांगितलेली माहिती पटकन समजण्यात अडचण येवू शकते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी त्रास (जसे की मधुमेह किंवा उच्च रक्तदाब) किंवा रक्तवहिन्यासंबंधी मेंदूच्या विकारांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असे आढळून आले की, शरीरातील चरबी आणि कमी संज्ञानात्मक स्कोअर (cognitive score) यांच्यात जवळचा संबंध (Body fat is a risk for cognitive function) आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जामा ओपन नेटवर्कमध्ये (JAMA Open Network) प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभ्यासाअंतर्गत, 9166 सहभागींच्या एकूण शरीरातील चरबीचा अंदाज घेण्यासाठी बायोइलेक्ट्रिकल रिअॅक्शनचे (Bioelectrical reaction) विश्लेषण करण्यात आले. याव्यतिरिक्त, 6733 सहभागींच्या मॅग्नेट रेझोनान्स इमेजिंग (MRI) टेस्टद्वारे ओटीपोटात चरबी (वसरल फॅट) आणि वस्कुलर ब्रेन इंजरी झाल्याचे आढळून आले, जेथे रक्तपुरवठा कमी होत होता. अभ्यास कसा झाला? अभ्यासात सहभागी लोकांचे वय 30 ते 75 वर्षे होते आणि सरासरी वय सुमारे 58 वर्षे होते. यापैकी 56 टक्के सहभागी कॅनडा आणि पोलंडमधील महिला होत्या. बहुतेक सहभागी युरोपियन वंशाचे गोरे होते आणि 16 टक्के इतर वांशिक पार्श्वभूमीचे होते. यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असलेल्या लोकांना वगळण्यात आले आहे. तज्ज्ञ काय म्हणतात प्रोफेसर सोनिया आनंद, मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या मायकेल जी. डी-ग्रूट स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका, म्हणतात, ‘आमच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, शरीरातील चरबी कमी करणे किंवा वाढू न देणे गरजेचे आहे. यामुळे cognitive फंक्शनचे कार्य नीट होऊ शकते. हे वाचा -  घरात या 5 गोष्टी राहिल्यानं बिघडत जातात होणारी कामं, प्रत्येक गोष्टीत बसतो खोडा त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या जोखमीशी जुळवून घेतल्यानंतरही शरीरातील वाढलेल्या चरबीचा प्रभाव कायम राहतो. म्हणून, संशोधकांनी हे देखील शोधले पाहिजे की अतिरिक्त चरबीशी संबंधित कमी संज्ञानात्मक कार्याशी जोडणारी इतर कोणती यंत्रणा आहेत. हे वाचा -  आयुष्याचं वाटोळं व्हायला या 3 गोष्टीसुद्धा पुरेशा; वेळ गेल्यानंतर अनेकांना कळतं या अभ्यासाचे सह-लेखक आणि कॅल्गरी विद्यापीठातील (University of Calgary) क्लिनिकल न्यूरोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक एरिक स्मिथ म्हणतात की, संज्ञानात्मक कार्य व्यवस्थित राहणं हा वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असू शकतो. याचा अर्थ असा की चांगले पोषण आणि शारीरिक हालचालींमुळे वजन आणि शरीरातील चरबीचे योग्य प्रमाण राखण्यामुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात