नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : अनियमित मासिक पाळीच्या (Irregular Periods) समस्येनं अनेक महिला त्रस्त असतात. अनियमित मासिक पाळीत अनेक वेळा स्त्रीला दोन ते तीन महिने मासिक पाळी येत नाही. काही वेळा मासिक पाळीत खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्त्राव होतो. यासोबतच डोके, पोट आणि पाठदुखी, मळमळ यासारख्या शारीरिक समस्यांमुळं महिला अस्वस्थ होतात. काही महिलांमध्ये मूड स्विंग, चिडचिडेपणा देखील दिसून येतो. जरी गर्भधारणेमुळं मासिक पाळी बंद होऊ शकते. परंतु, जर तुम्हाला ही समस्या सतत होत असेल, तर डॉक्टरांशी (Foods which regulate Periods) नक्की संपर्क साधा. अनियमित मासिक पाळीची कारणं खराब जीवनशैली, तणाव, चुकीचा आहार, कमी झोपणं, जास्त काळजी करणं आदी घटक (Irregular Periods Reasons) मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करतात. PCOD, लठ्ठपणा, अंडाशयातील सिस्ट, PCOS, शरीरातील विविध स्रावांमध्ये असंतुलन (Hormonal Imbalance) यासारख्या काही शारीरिक समस्यांमुळं मासिक पाळी अनियमित असू शकते. जर या समस्या तुम्हाला त्रास देत असतील तर एकदा डॉक्टरांशी नक्की संपर्क करा. मासिक पाळी नियमित करण्यासाठी हे पदार्थ खा काही खाद्यपदार्थांमध्ये असे घटक असतात, जे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर करण्यात मदत करतात (Diet Tips for Irregular Periods). आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे नियमित खाल्ल्यानं मासिक पाळीशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. 1 हळद (turmeric) हळद ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. याच्यामुळं संसर्गजन्य आजारही टाळले जातात. तसंच, अनियमित मासिक पाळीची समस्याही हळदीचं सेवन केल्यानं सोडवता येते. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध मधासोबत प्या. यामुळं पाळीच्या वेळी पोटात/पाठीत दुखणं (Period cramps) बरं होऊ शकतं. हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन हे इस्ट्रोजेन हार्मोनसारखाच परिणाम करतं. याच्यामुळं अनियमित असलेली मासिक पाळी नियमित करण्यात मदत होते. 2 जिरे आहेत फायदेशीर जिऱ्यामध्ये काही प्रभावी पोषक घटक असतात, जे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावण्यास आणि मासिक पाळीचे नियमन करण्यास मदत करतात. काही दिवस नियमितपणे जिऱ्याचं पाणी प्यावं. यासाठी रात्री एक कप पाण्यात दोन चमचे जिरे घालून ठेवावे. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे वाचा - तुमच्याही पोटात जोरात दुखतं का? हा अल्सरचा परिणाम असू शकतो, जाणून घ्या त्यावरील उपाय 3 मासिक पाळी अनियमित असताना अननस खा जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा जास्त वेदना होत असतील, पेटके येत असतील तर अननस नक्की खा. या फळामध्ये ब्रोमेलेन नावाचं एन्झाइम असतं, ते गर्भाशयाच्या आवरणातील समस्या दूर करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतं. हे लाल आणि पांढऱ्या रक्त पेशींचं उत्पादन वाढवतं. याच्यामुळं मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव योग्य प्रमाणात राहतो. 4 दालचिनी करा उपयोग दालचिनीमुळं शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. इन्सुलिनची पातळी कमी असल्यामुळं देखील पीरियडशी संबंधित समस्या उद्भवतात. तुम्हाला PCOS असेल तर दालचिनी खावी. याच्यामुळं वेदना कमी होतात आणि अनियमित मासिक पाळी सामान्य होते. हे वाचा - Foods For Long Life: या दोन गोष्टी खात असल्यानं घटत आहे तुमचं आयुष्य, नॉनव्हेज खाणाऱ्यांनी लक्ष द्या 5 बडीशेप पाणी प्या बडीशेप अनियमित मासिक पाळीवर उपचार करण्यासाठी अतिशय प्रभावी औषधी वनस्पती आहे. याच्यामुळं हार्मोन्स संतुलित करण्यास, ओव्ह्युलेशनला चालना देण्यास मदत होते. मासिक पाळीमुळे जाणवणारे पेटके, पोटदुखी यापासूनही आराम मिळतो. एक ग्लास पाणी उकळा. त्यात १-2 चमचे बडीशेप घाला. पाणी अर्धं राहिल्यावर गाळून घ्या. हे बडीशेपचं पाणी प्यायल्यानं अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.