मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Date : या काळात महिलांना खजूर खाण्याचे आहेत खूप फायदे; वाचा सर्व माहिती

Benefits of Date : या काळात महिलांना खजूर खाण्याचे आहेत खूप फायदे; वाचा सर्व माहिती

महिलांसाठी खजूर खाणं विशिष्ट वेळी खूप फायदेशीर आहे. FDAनुसार, खजुरांमध्ये हेल्दी फॅट्स, सोडियम, आहारातील फायबर, नैसर्गिक साखर, प्रथिने, व्हिटॅमिन डी, लोह आणि पोटॅशियम असते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : खजूर (dates ) हे एक सुपरफूड आहे, जे खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. महिलांसाठी खजूर खाणं विशिष्ट वेळी खूप फायदेशीर आहे. FDAनुसार, खजुरांमध्ये हेल्दी फॅट्स, सोडियम, आहारातील फायबर, नैसर्गिक साखर, प्रथिने, व्हिटॅमिन डी, लोह आणि पोटॅशियम असते. तर महिलांसाठी कोणत्या काळात खजूर खाणं खूप (eating dates benefits) फायदेशीर आहे, याविषयी माहिती घेऊया.

याकाळात महिलांनी 6 खजूर खाणं खूप फायदेशीर आहेत

गरोदरपणात प्रसूती वेदना खूप गंभीर असतात. पण तज्ज्ञांच्या मते खजुराच्या सेवनाने प्रसूती वेदना कमी होण्यास मदत होते. हेल्थलाइनच्या अहवालात म्हटले आहे की, खजुराच्या सेवनाने रक्त परिसंचरण वाढण्यास मदत होते. त्यामुळे गर्भाशय ग्रीवामध्ये लवचिकता आणि वाढ होते आणि प्रसूती वेदनांमध्ये कमी वेदना सहन कराव्या लागतात. संशोधनानंतर ही माहिती समोर आली, ज्या महिलांनी गरोदरपणात दररोज 6 खजूर खाल्ले त्यांच्या प्रसूती वेदना कमी झाल्याचे दिसून आलं आहे.

हे वाचा - 10 रुपयांचं आमिष दाखवून 7 वर्षीय बालिकेवर नराधमाचा Rape; बालिकेची गंभीर अवस्था

खजूर खाण्याचे फायदे -

हेल्थलाईनच्या मते, खजुराचे सेवन केल्याने खालील फायदे मिळू शकतात.

खजूर खाल्ल्याने संसर्गविरोधी क्षमता विकसित होते. कारण, त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील पेशींना रोगांपासून संरक्षण देतात.

हे वाचा - T20 World Cup : भारत-पाकिस्तान T20 मॅच पाहण्यासाठी 3GB नेटपॅक; रोमांच मिस करू नका हे आहेत Plans…

खजूराचे सेवन मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते. कारण, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे मेंदूच्या पेशींची इंफ्लामेशन कमी करून त्यांची क्षमता विकसित करतात.

खजूरांमध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक हाडे मजबूत होण्यास मदत करतात.

टीप - गर्भधारणेदरम्यान खजूर किंवा इतर कोणताही आहारात बदल करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

First published:

Tags: Health, Health Tips