मुंबई, 06 जून : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आरोग्यतज्ज्ञ लिंबू, संत्री, किवी, मोसंबी, द्राक्ष, टेंजेरिन इत्यादी लिंबूवर्गीय फळांचा आहारात भरपूर समावेश करण्याचा सल्ला देत आहेत. याचे कारण असे की लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीचा मुख्य स्त्रोत आहेत, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruits) खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यामुळे त्वचादेखील निरोगी राहते. लिंबूवर्गीय फळांमधील अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की हे सर्व पोषक घटक कर्करोग, हृदयविकार, मेंदूचे आजार, किडनी स्टोन इत्यादींसारख्या जुनाट परिस्थितींपासून संरक्षण करण्यास मदत करतात. जाणून घेऊया, लिंबूवर्गीय फळांचे आरोग्यासाठी इतर कोणते फायदे (Benefits of Citrus Fruits) आहेत. मेंदू निरोगी राहतो - Prevention.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे अँटिऑक्सिडंट असतात. फ्लेव्होनॉइड्स मेंदूला निरोगी ठेवतात. यामुळे पार्किन्सन रोग, अल्झायमर रोग, स्मृतिभ्रंश इत्यादी होण्याचा धोका देखील कमी होतो. मुतखड्यावर उपयोगी - लघवीतील खनिजांच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात किडनी स्टोन किंवा खनिज क्रिस्टल्स तयार होऊ शकतात. खनिज क्रिस्टल्स खूप वेदनादायक असू शकतात. युरिनरी सायट्रेटची पातळी कमी झाल्यामुळे विशिष्ट प्रकारचा किडनी स्टोन देखील होऊ शकतो. एका अभ्यासात असे म्हटले आहे की, जे लोक लिंबूवर्गीय फळांचे सेवन कमी प्रमाणात करतात, त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते. लिंबूवर्गीय फळांमुळे मूत्रात सायट्रेटची पातळी वाढते, ज्यामुळे मुतखडा (किडनी स्टोन) होण्याची शक्यता कमी होते. वजन नियंत्रित - लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते. संत्री, द्राक्षे खाल्ल्याने रक्तातील साखर स्थिर राहते, त्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. जेव्हा तुम्ही लिंबूवर्गीय फळे किंवा प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ खातात तेव्हा तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते. ही फळे कापून खाण्याचा प्रयत्न करा आणि ज्यूस न बनवून प्या. मात्र, ज्युस बनवल्याने फायबरचे प्रमाण कमी होते. लिंबूवर्गीय फळे हृदयासाठी आरोग्यदायी असतात - हृदय दीर्घकाळ निरोगी राखायचे असेल, तर लिंबूवर्गीय फळे आहारात नियमित घ्या. अभ्यासानुसार, ज्या लोकांनी कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया केली होती, त्यांनी एक महिना दररोज संत्री किंवा कोणत्याही प्रकारच्या द्राक्षांचे सेवन केले, त्यानंतर त्यांच्यात खराब कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. लिंबूवर्गीय फळांमध्ये विरघळणारे तंतू, फ्लेव्होनॉइड्स यांसारखी विविध संयुगे असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हे वाचा - Heart Attack वेळी फक्त छातीतच दुखत नाही; अनेकांमध्ये अशी लक्षणं पण दिसून येतात कर्करोगापासून संरक्षण - लिंबूवर्गीय फळांमुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. विशेषत: ही फळे इतर फळांच्या तुलनेत पचनमार्ग, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिका कर्करोग, आतड्याचा कर्करोग इत्यादींपासून संरक्षण करतात. व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स असलेल्या फळे भाज्या खायला हव्या, त्यामुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते. हे वाचा - स्वयंपाकात दालचिनीचा वापर करणाऱ्या अनेकांना त्याचे हे आरोग्य फायदे माहीत नाहीत प्रतिकारशक्ती वाढते - लिंबू, संत्री, मोसंबी या लिंबूवर्गीय फळांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्हिटॅमिन सी ची मात्रा शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत करते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपले कार्य योग्यरित्या करते. संत्र्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या अनेक प्रकारच्या नुकसानीपासून डीएनएचे संरक्षण करते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







