नवी दिल्ली, 28 जानेवारी : आरोग्याविषयी खबरदारी (Health care) घेणं असो किंवा केस आणि त्वचेची काळजी घेणं असो, कोरफडीचा (Aloe Vera) अनेक प्रकारे उपयोग केला जातो. अनेकजण वेगवेगळ्या कारणांसाठी डोळे बंद करून कोरफडीचा वापर करताना दिसतात. मात्र, कोरफडीचं जास्त सेवन करणं आपल्यासाठी हानिकारक (Harmful Aloe Vera) ठरू शकतं. म्हणूनच, कोरफडीचा कोणत्या वेळी, किती प्रमाणात आणि कसा वापर करावा यासंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊ, तज्ज्ञांचा सल्ला न घेता कोरफडीचं अति प्रमाणात सेवन केल्यानं कोणत्या समस्यांना सामोरं (Aloe Vera Side Effects) जावं लागू शकतं.
त्वचेची अॅलर्जी होऊ शकते
कोरफडीचं अतिसेवन आणि त्वचेवर मोठ्या प्रमाणात वापर केल्यानं त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळं फुटकुळ्या, पुरळ, रॅशेस, लालसरपणा, त्वचेची जळजळ आणि खाज यासारख्या समस्या तुमच्या समोर येऊ शकतात.
शरीरीतील पाण्याची पातळी कमी होऊ शकते
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस घेतात. लक्षात ठेवा की, असं केल्यानं शरीरीतील पाण्याची पातळी कमी देखील (डिहायड्रेशन - dehydration) होऊ शकते. त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता, मळमळ यासारख्या समस्या होऊ शकतात.
हे वाचा -
चहा तर सगळेच बनवतात; या ट्रिक्स वापराल तर सगळे म्हणतील.. चहा असावा तर अस्साच
अतिसार होऊ शकतो
सतत कोरफडीचं सेवन केल्यानं अतिसार देखील होऊ शकतो. कोरफडीमध्ये रेचक गुणधर्म असतात; ज्यामुळं तुमची IBS समस्या अधिक वाढू शकते. याच्या रसामध्ये अँथ्राक्विनोन नावाचा द्रवदेखील असतो, जो रेचक आहे. यामुळं तुम्हाला ओटीपोटात दुखणं, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या देखील होऊ शकतात.
हे वाचा -
थंडीमुळे पायांच्या बोटांना सूज आलीय का? हे 7 घरगुती उपाय देतील जलद आराम
अशक्तपणा येऊ शकतो
कोरफडीचा रस सतत दीर्घकाळ सेवन केल्यानं शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होऊ शकतं. ज्यामुळं तुम्हाला भीतीची किंवा चिंतेची भावना होऊ शकते. यासोबतच अशक्तपणाही जाणवू शकतो. त्यामुळं कोरफडीचं जास्त सेवन करणं टाळावं.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.