ओवा हृदयासाठी चांगला असतो. ओव्यात थाइमोल, नियासिन आणि इतर व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे हृदय मजबूत राहातं.रोज सकाळी पाण्यात ओवा टाकून ते पाणी उकळून प्या.
ओव्यानं वजन कमी होतं. एक कप पाण्यात ओवा भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी गाळून त्यात 1 चमचा मध, लिंबू टाकून रिकाम्या पोटी ते पाणी प्या.
ओव्याचं पाणी प्यायल्यानं शरीरातला मेटॅबोलिझम वाढतो. फॅट बर्न होते. त्वचा चमकते. तुमचं वयही कमी दिसतं.