मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Heart Failure : हार्ट फेल्युअर होणं म्हणजे नेमकं काय? पाहा याची लक्षणं

Heart Failure : हार्ट फेल्युअर होणं म्हणजे नेमकं काय? पाहा याची लक्षणं

What Is Heart Failure, Know Its Symptoms And Causes In Marathi - टेन्शनमुळे बऱ्याच लोकांना शांत झोप लागत नाही. अशा परिस्थिती व्यक्तीला अनेक आजार होण्याची भीती असते. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या हृदयावर होतो. हृदय कमकुवत झाल्यास हार्ट फेल्युअर होण्याचीही शक्यता असते.

What Is Heart Failure, Know Its Symptoms And Causes In Marathi - टेन्शनमुळे बऱ्याच लोकांना शांत झोप लागत नाही. अशा परिस्थिती व्यक्तीला अनेक आजार होण्याची भीती असते. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या हृदयावर होतो. हृदय कमकुवत झाल्यास हार्ट फेल्युअर होण्याचीही शक्यता असते.

What Is Heart Failure, Know Its Symptoms And Causes In Marathi - टेन्शनमुळे बऱ्याच लोकांना शांत झोप लागत नाही. अशा परिस्थिती व्यक्तीला अनेक आजार होण्याची भीती असते. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या हृदयावर होतो. हृदय कमकुवत झाल्यास हार्ट फेल्युअर होण्याचीही शक्यता असते.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 जानेवारी : हल्ली सर्वांचच आयुष्य खूप व्यस्त आणि तितकंच धावपळीचं झालं आहे. लोकांना शांतपणे बसून खाण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच व्यायामही फारसा वेळ मिळत नाही. टेन्शनमुळे बऱ्याच लोकांना शांत झोपही लागत नाही. अशा परिस्थिती व्यक्तीला अनेक आजार होण्याची भीती असते. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या हृदयावर होतो.

हृदय कमकुवत झाल्यास हार्ट फेल्युअर होण्याचीही शक्यता असते. बेंगळुरू इलेक्ट्रॉनिक सिटी येथील कावेरी हॉस्पिटल्समधील ज्येष्ठ इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. गणेश नल्लूर शिवू यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

हार्ट फेल्युअर म्हणजे काय?

हृदय हा स्नायूंनी बनलेला एक पंप आहे आणि मेंदू, किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांसह शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तपुरवठा करणं हे त्याचं कार्य आहे. जेव्हा हृदय या महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा करण्यात अपयशी ठरतं तेव्हा त्याला हार्ट फेल्युअर असं म्हणतात.

हार्ट फेल्युअरची लक्षणं कोणती?

चालताना किंवा इतर कोणतीही कामं करताना श्वास घेण्यास त्रास होणं, पाय किंवा अ‍ॅबडोमेनला सूज येणं, थकवा येणं आणि ऊर्जेची कमतरता जाणवणं ही हार्ट फेल्युअरची सामान्य लक्षणं आहेत.

हार्ट फेल्युअरचा त्रास कोणाला होऊ शकतो?

हार्ट अ‍ॅटॅक, अँजिओप्लास्टी किंवा कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंगची हिस्ट्री असलेल्या रुग्णांना हार्ट फेल्युअरचा त्रास होऊ शकतो. अनियंत्रित रक्तदाब आणि दीर्घ काळ असलेल्या डायबेटीसमुळेही हृदयक्रिया बंद पडू शकते. विषाणूजन्य आजारानंतर तरुण रुग्णांमध्येदेखील हार्ट फेल्युअर होऊ शकतं. याला विषाणूजन्य मायोकार्डायटिस किंवा हृमॅटिक हृदयविकार (हार्ट फेल्युअरला कारणीभूत असलेला व्हॉल्व्हुलर विकार) असं म्हणतात.

हार्ट फेल्युअरचं निदान आणि उपचार करण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात?

या समस्येचं निदान करण्यासाठी डॉक्टर सामान्यपणे ईसीजी, इकोकार्डिओग्राम आणि ब्लड टेस्ट करतात. इकोकार्डिओग्राम ही हृदयाची अल्ट्रासाउंड टेस्ट आहे. हृदयाची कार्यक्षमता (जी सहसा व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन असते) आणि हृदयातल्या वेगवेगळ्या झडपांचं कार्य (मायट्रल, एऑर्टिक, ट्रायकस्पिड आणि पल्मोनरी) या टेस्टमधून तपासले जाते. ब्लड टेस्टच्या माध्यमातून अशक्तपणा, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, थायरॉइड आदी घटक या समस्येसाठी कारणीभूत आहेत का हे तपासलं जातं. हार्ट फेल्युअरचं निदान झाल्यानंतर डॉक्टर हृदयाच्या धमन्यांमधले अडथळे, तसंच हार्ट फेल्युअरचं नेमकं कारण शोधण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

हार्ट फेल्युअरवर उपचार कोणते केले जातात?

शरीरातले अतिरिक्त द्रवपदार्थ शरीराबाहेर पडण्यासाठी डॉक्टर औषधं लिहून देतात (लघवीचं प्रमाण वाढवणारं औषध) आणि हृदयाचं कार्य सुरळीत होण्यासाठी औषधं (एसीई इन्हिबिटर्स, एटी2 अँटागोनिस्ट आणि बीटा ब्लॉकर्स) लिहून देतात.

हार्ट फेल्युअरसाठी इतर उपचार कोणते असतात?

डॉक्टर सर्वप्रथम हार्ट फेल्युअरची कारणं विचारात घेतात. यामध्ये कोरोनरी अँजिओप्लास्टी, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग आणि व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट यांचा समावेश असू शकतो. याशिवाय विशेष प्रकारचे पेसमेकरदेखील (कार्डिअ‍ॅक रिसिन्क्रोनायझेशन थेरपी) आहेत, जे रुग्णांमध्ये लक्षणं आणि prognosis सुधारू शकतात. एखाद्या अत्यवस्थ रुग्णासाठी डाव्या व्हेंट्रिक्युलर असिस्ट उपकरणाचा किंवा हृदय प्रत्यारोपणाचा विचार केला जातो.

रुग्णाने स्वतः काय काळजी घ्यावी?

A) डॉक्टरांनी सांगितलेली औषधं रुग्णांनी त्वरित सुरू करावीत.

B) रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन चालण्यासारखा व्यायाम नियमितपणे करावा.

C) रोजच्या आहारात मीठाचं सेवन कमी करावं.

D) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज द्रवपदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावं.

E) हृदयाचं कार्य सुरळीत सुरू आहे ना याची तपासणी करण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जावं.

F) कोणत्याही स्वरूपाची लक्षणं गंभीर स्वरूपात जाणवू लागली तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

या आजाराचं प्रोग्नॉसिस म्हणजे काय?

हार्ट फेल्युअरचं प्रोग्नॉसिस (भाकीत) काही कॅन्सर प्रकारांपेक्षाही वाईट असू शकतं. त्यामुळे रुग्णांनी त्वरित उपचार घेतले पाहिजेत आणि डॉक्टरांच्या सूचनांचं काटेकोर पालन केलं पाहिजे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle