शेवग्याच्या शेंगाचा उपयोग अधिकतर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये केला जातो. शेवग्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असल्याने त्याझाडाची पाने, फुले, मुळ आणि झाडावर येणाऱ्या शेंगा इत्यादी सर्वांचा खाण्यामध्ये समावेश केला जातो. मोरिंगा म्हणजेच शेवग्याची पावडर ही त्याच्या पानांपासून बनवली जाते. यापावडरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असून यात पालकच्या भाजी पेक्षा जास्त लोह आढळते. शेवग्याच्या पानांच्या पावडर पासून बनवण्यात येणाऱ्या पावडरचे शरीराला अनेक फायदे आहेत. अशी बनवा शेवग्याच्या पानांची पावडर : शेवग्याच्या पानांची पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम झाडाची एक फांदी कापून घ्या. मग ही फांदी एका कापडावर लटकवून ठेवा. आता ही पाने सुकवण्यासाठी सर्वप्रथम त्यावरील घाण स्वच्छ करा. ही पाने सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा आणि मग गाळून घ्या. तयार झालेली शेवग्याच्या पानांची पावडर पाण्यात मिसळून प्या. शरीराला मिळते ऊर्जा : जेव्हा थकवा आणि शरीरात अजिबात ताण नाही असे वाटेल अशावेळी शेवग्याच्या पानांची ही पावडर खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते. यात मॅग्नेशियम आणि आयरनची मात्रा जास्त असलयाने लगेचच थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.
टॉक्सिन बाहेर काढते : शेवग्याच्या पानांची पावडर शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी मदत करते. यापावडरमध्ये असणारे एंटी-ऑक्सीडेंट्स फ्री रेडिकल्ससोबत लढतात आणि शरीराला आतून साफ करण्यास उपयोगी ठरतात. वजन कमी होते : शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, त्यामुळे लोक प्रमाणातच जेवण करतात. मेटाबॉलिज्मला दुरुस्त करण्याचे देखील काम करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. Weight Loss : पाणी प्यायल्याने वजन कमी होत? जाणून घ्या पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत पचनक्रिया चांगली होते : शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, त्यामुळे पचनक्रिया उत्तम होते. यामुळे खास करून कब्जच्या समस्येपासून सुटका मिळते. तसेच यातील एंटी-इंफ्लेमेटरी गुण पोटातील इंफेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात.