मुंबई, 17 फेब्रुवारी : आपल्या आजूबाजूला जसे चहा (tea) किंवा कॉफीप्रेमी (coffee lovers) असतात, अगदी तितके नाही पण मोठ्या प्रमाणात बिअरप्रेमीही सर्रास पाहायला मिळतात. पार्टीची रंगत वाढवायची असेल किंवा एखादं सेलिब्रेशन (celebration) करायचं असेल तर अनेकांना बिअर ही हवीच असते. बिअर कायम हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या (color) बाटलीत पाहायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, बिअर साठवण्यासाठी या दोन रंगांच्याच बाटलीचा वापर का करतात? बिअर हे जगातील सर्वांत आवडत्या पेयांपैकी एक असल्याचं बोललं जातं. जगातील सर्वांत जुन्या पेयांमध्ये पाणी, चहा नंतर बिअर तिसऱ्या स्थानावर आहे. एका जुन्या आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 43,52,65,50,00,000 बिअर कॅन प्यायल्या जातात. आजच्या जमान्यात पबमधला पार्टीचा मूड असो की मित्रमंडळींचे सेलिब्रेशन असो, बिअर हवीच. पण जे लोक बिअरच्या बाटल्या रिकाम्या करतात, त्यांच्या लक्षात आले असेल की बिअरची बाटली एकतर हिरव्या किंवा तपकिरी रंगाची आहे. तुम्ही या दोन रंगांव्यतिरिक्त असणाऱ्या बाटलीत बिअर कधी पाहिली आहे का? पण आजही बहुतेकांना बिअरच्या बाटल्या या दोन रंगात का येतात, याचं कारण माहीत नाही. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिलंय. वाचा : Accident CCTV: भरधाव कारची दुचाकीला धडक; खाली पडलेल्या दाम्पत्याला कारने नेलं फरफटत …म्हणून निवडला तपकिरी रंग पहिली बिअर कंपनी हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये सुरू करण्यात आली होती, असं मानलं जातं. सुरुवातीच्या काळात जेव्हा बिअर तयार केली गेली. तेव्हा ती पारदर्शक काचेच्या बाटलीमध्ये दिली जायची. कालांतराने बिअर तयार करणाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, जेव्हा बिअरची बाटली सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते, त्यावेळी बिअरमधील आम्ल आणि सूर्याच्या UV किरणांमध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे बिअरला दुर्गंधी येते, व लोक ती पित नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी बिअर उत्पादकांनी एक योजना तयार केली. त्यानुसार बिअरसाठी ब्राऊन कोटेड अर्थात तपकिरी बाटल्या निवडण्यात आल्या. ही युक्ती कामी आली. या रंगाच्या बाटल्यांमध्ये ठेवलेली बिअर खराब होत नव्हती, कारण सूर्याच्या किरणांचा तपकिरी बाटल्यांवर परिणाम होत नव्हता. वाचा : चुंबनाचा उगम भारतात झाला नंतर जगभर पसरला? पुरावे काय सांगतात? दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मात्र तपकिरी बाटल्यांचा तुटवडा निर्माण झाला. या रंगाच्या बाटल्या उपलब्ध होत नव्हत्या. तेव्हा बिअर बनवणारे असा रंग शोधत होते, ज्यावर सूर्यकिरणांचा प्रभाव पडणार नाही. त्यावेळी तपकिरी रंगाऐवजी हिरवा रंग निवडण्यात आला. तेव्हापासून बिअर हिरव्या बाटल्यांमध्ये येऊ लागली. बहुतेक लोक फक्त बिअर पिण्यावर भर देतात. पण ही बिअर तपकिरी किंवा हिरव्या रंगाच्या बाटलीत का येते, याचा विचार सहसा कोणी करीत नाही. मात्र, बिअरची बाटली हिरव्या व तपकिरी रंगाची ठेवण्यामागे खूप महत्त्वाचे कारण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.